=======================
(.प्र.)/ २५ सप्टेंबर
चंद्रपूर : वरोरा तालुक्यात मोठया प्रमाणात सोयाबीन पिकावर मोझाक व बुरशी सारखा रोग आल्याने तालुक्यात मोठया प्रमाणात सोयाबिन पिकाचे नुकसान झाल्याने शासनाने अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ता किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात आज चंद्रपूर- नागपूर महामार्गावर टेमुर्डा येथे शेकडोड शेतकर्यांनी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तब्बल १ तास वाहतुक रोखण्यात आली.
शेतकरी यांनी तालुक्यात मोठया प्रमाणात सोयाबीन पीकाची लागवड केली असून सुरूवातील मोझाक रोगाने थैमान घातले मात्र दोन ते तीन दिवसात बुरशीसारखा रोग आल्याने सोयाबीन पिक पुर्णता उध्वस्त झाले. या सर्व पिकाचे शासनाने त्वरीत पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रूपयांची मदत द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी आंदोलनस्थळी केली. यावेळी वरोरा येथील नायब तहसिलदार यांना आंदोलनस्थळी येवून शेतकर्यांचे निवेदन स्विकारले. सदर निवेदन शासनाकडे पोहचवू असे आश्वासन तहसिलदार यांनी दिले. येत्या दोन ते तीन दिवसात दखल घेऊन शेतकरी यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येत ताला ठोकू असा इशारा आंदोलनातून देण्यात आला.यावेळी आंदोलनात शेतकरी किशोर डुकरे यांच्यासह पुरूषोत्तम पावडे,संदीप वासेकर,श्रीकृष्ण देवतळे,आकाश धवने, राजु डुकरे, लक्ष्मण आसूटकर, मोतीराम जांभुळे, आशिष जांभूळे, महेंद्र गारघटे, उमेश टोंगे, धर्मदास डुकरे, अशोक मगरे, प्रभाकर मगरे, अंकूश चौधरी, रघु खापणे तसेच परिसरातील शेतकरी बांधवाची मोठया संख्येने उपस्थिती होती.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793





















