==================
*श्रीमती मिराबाई टेकाम बहुउद्देशिय संस्थेचा उपक्रम*
=========≈==============
*चंद्रपूर (का. प्र.) – श्रीमती मिराबाई टेकाम बहुउद्देशिय संस्था, गडचांदुर च्या वतीने डेबु सावली वृद्धाश्रमात फळे व बिस्कीटांचे वितरण करण्यात आले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कु.माधुरी टेकाम, उपाध्यक्ष सुरेंद्र मुथलकर, कोषाध्यक्ष वामन निपुंजे, सौ.निर्मला कोटनाके,नामदेव किन्नाके तसेच सामाजिक कार्यकर्ते शेखर तावाडे उपस्थीत होते. याप्रसंगी वृद्धांशी हितगुज करीत प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करण्यात आली. वृद्धाश्रमाला वेळोवेळी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कुमारी माधुरी टेकाम यांनी दिले व कोरपणा तालुक्यातील निराधार वृद्धांकरिता वृद्धाश्रमाची निर्मिती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला वृद्धाश्रमाला आर्थिक देणगी तथा फळ व बिस्किटांचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक डेबू सावली वृद्धाश्रमाच्या कार्यवाहक सुमित्रा आवळे तर आभार प्रदर्शन श्री शेखर तावाडे यांनी मानले.*
====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793