Home
Home चंद्रपूर *पंचायत समिती बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम ठेकेदार मालामाल*

*पंचायत समिती बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम ठेकेदार मालामाल*

0
136

=======================

*हकानी शेख जिवती तालुका प्रतिनिधी*

========================

   *जिवती* 

=======================
जिवती:- तालुक्यातील भोक्सापूर, शंकर पठार,चिलाटी गुडा या गावात बांधकाम विभाग पंचायत समिती जिवती च्या वतीने नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू असून या अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब समोर आली आहे.मातीमिश्रीत रेती सर्रासपणे वापरण्यात येत आहे. सिमेंट हलक्या दर्जाचे आणि कमी प्रमाणात वापरले जात असून लोखंड नियमानुसार वापरले नसून बांधकामांवर पाणी ( किव्हरींग ) करण्यात येत नसल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे या तीनही नवीन अंगणवाडी इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची तक्रार निवेदनाद्वारे हकानी शेख जिवती तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांच्या कडे केली असून. संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी आणि परवाना काळयायादीत समाविष्ट करण्यात यावे व संबंधित इंजिनिअर वर विभागीय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. चौकशी करून कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला. संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांनी निवेदनाची दखल घेऊन कनिष्ठ अभियंता उरकुडे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले,

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here