========================
*भद्रावती PWD चे उपअभियंता मत्ते साहेब देत आहे ठेकेदारांना संरक्षण ?*
========================
दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहर अध्यक्ष सुरज शहा यांना माहिती प्राप्त झाली की भद्रावती ते चंदणखेडा मार्गावर रोडचे काम सुरू आहे व ते काम निष्कृष्ट दर्जेच सुरू आहे. सविस्तर कामाची माहिती घेण्यासाठी जागेवर पाहणी करण्यात आली त्यावेळी असं दिसून आलं की 2 दिवसा पहिले रोडचं काम करण्यात आले आणि तिथले डांबर व मुरूम निघण्याचं काम 2 दिवसातच सुरू झाले. पतल्या डांबर वर गिट्टची चादर सोडण्यात येत आहे असं तिथं परस्पर दिसून आलं आहे. हे सगळ्या कामांमध्ये भ्रष्टाचार दिसून येत आहे. यावर बरकाई ने चौकशी करून माहिती मिळाली की यात भद्रावती PWD चे उपअभियंता मत्ते साहेब यांच संरक्षण ठेकेदारांना मिळत आहे. प्रत्येक वर्षी भद्रावती तालुक्यातील एकाच एक रोडचं काम होत आहे व भद्रावती PWD चे उपअभियंता मत्ते साहेब यांच्या कडून त्यांच्या 4 ते 5 चाहत्या ठेकेदारांनाच हे कामे भेटत आहे. आणि आजच्या ऑनलाइन च्या जमान्यात जिथं ऑनलाइन टेंडर भरल्या जाते तिथं सुद्धा जोड जंतर करून 0.99 आणि 0.55 या दरात below rate मधे टेंडर चाहत्या ठेकेदारांना मिळत आहे. यात प्रश्न पडतो की ठेकेदारांवर भद्रावती चे PWD उपअभियंता मत्ते साहेब यांच संरक्षण तर नाही ? या बाबत तक्रार करण्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कुंभे साहेब यांनी माहिती दिली व या विषयी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कारवाही करण्यात यावी या बाबत निवेदन देण्यात आले.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069