======================
* भद्रावती*
======================
भद्रावती तालुक्यातील लोणारा गावात जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करण्या करिता पाण्याची टाकी मंजूर झाली. या पाण्याच्या टाकी विषयी सतत गावकऱ्यामध्ये वाद सुरू असायचा. संबंधित विषयाची माहिती गावकऱ्यांनी आम आदमी पार्टी भद्रावती चे वसीम कुरेशी यांना दिली. माहिती मिळताच आम आदमी पार्टी चे शहराध्यक्ष सुरज शहा, उपाध्यक्ष सुमित हस्तक व वसीम कुरेशी यांनी गावकऱ्यांना भेट दिली. पाण्याच्या टाकी विषयी वाद समजून व गावकऱ्यांना समजवून व या वाद विषयी तोडगा काढून, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य व गावकऱ्यान मधे मध्यस्ती करून सुरज शहा यांनी मार्ग मोकळा करून दिला. त्यावेळी समस्त गावकऱ्यांनी सुरज शहा, सुमित हस्तक, वसीम कुरेशी व समस्त आम आदमी पार्टी चे कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केला.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069





















