*महाशिवरात्री सणाचे पार्श्वभुमीवर मुरमुऱ्याच्या पोत्याआड मध्यप्रदेश राज्यातुन गडचिरोली जिल्ह्यात जाणारा प्रतिबंधित मद्यसाठा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही*

0
33

==========================

   *चंद्रपूर*

==========================

चंद्रपुर जिल्ह्यामध्ये मा. श्री. मु मक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, मा. रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मद्य विक्री तसेच निर्माती व वाहतुक करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालु आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक मा. श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातुन मोठ्याप्रमाणात अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्यांची माहिती काढून त्यावर कार्यवाही सुरू आहे.

==========================

आज दिनांक ०७/०३/२०२४ रोजी १०.०० वा. चे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, एक बोलेरो पिकअप वाहन मध्यप्रदेश येथून गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतुक करून विक्रीकरीता नेत आहे. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर येथे सापळा रचला असता चंद्रपुर रोडने येणारी महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम. एच. ३४ बी.जी. ४१२६ या वाहनास शिताफीने ताब्यात घेवून वाहनाची तपासणी केली असता, १) गोवा ग्रॅन्ड दारूनी भरलेल्या १८० एम एल च्या ३९ पेट्या किमत एकुण २,१४,५००/- रू, २) एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र एम. एच. ३४ बी.जी. ४१२६ किंमत ८,००,०००/- ३) दोन नग मोबाईल किंमत १०,०००/- रू. असा एकूण १०,२४,५००/- रू. चा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोस्टे बल्लारपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील आरोपी नामे १) फारूख शेख मुमताज शेख, वय २१ वर्ष, धंदा ड्रायव्हर, रा. नुरानी नगर, लालकिल्ला गेट जवळ, महल, नागपूर जिल्हा नागपूर २) तुषार संतोष नेहारे, वय २३ वर्ष, धंदा मजुरी, रा. चिचभवन, वर्धा रोड, शांतीनिकेतन (झोपडपट्टी) नागपूर यांस पुढिल तपासकामी पोस्टे बल्लारपूर यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरचा मुद्देमाल कुठून आणला व कुठे चालला यावावतचा तपास सुरू आहे.

===========================

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश काँडावार यांचे नेतृत्वात सपोनि. ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा. संजय आतकुलवार, पोकों, गोपाल आतकुलवार, पोकों. नितीन रायपुरे, सायबर गुन्हे शाखेचे पोकों. राहुल पोंदे यांनी केली आहे.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here