चंद्रपूर शहरात घरफोड्या करणाऱ्या 8 आरोपींना अटक

0
86

चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मागील काही महिन्यांपासून घरफोडीच्या घटनेत वाढ झाली होती , अनेक घरफोडीचे गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती , इतकेच नव्हे तर पुरात बुडालेल्या घरात सुद्धा चोरांनी हात साफ केला .
हे सर्व गुन्हे रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडले होते , त्याकरिता पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वात घरफोडीचे गुन्हे उघडकीस करण्यास यश प्राप्त झाले असून एकूण 6 घरफोडी करणाऱ्या विविध आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे . 8 मे 2022 रोजी डॉ . निखिल बिश्वास यांनी यांनी तक्रार दिली की ते परिवारासाहित वास्तूच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले असता अज्ञातांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश करीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 91 हजारांचा मुद्देमालावार हात साफ केला .दुसरा गुन्हा 23 जून 2022 रोजी सुभाष दासरपू हे परिवारासाहित बाहेर गावी गेले असता अज्ञातांनी घरात प्रवेश करीत लॅपटॉप व सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 16 हजार रुपयांच्या मालावर हात साफ केला . गुन्हे शोध पथक प्रमुख एकरे यांनी मोठ्या शिताफीने घरफोडीच्या प्रकरणात तपास करीत छडा लावला , पहिल्या गुन्ह्यातील आरोपी मनी कालीपद बिश्वास , सुमन दिलीप डकूआ , पिंकू नरेंद्र मिस्त्री यांना अटक केली . यांच्या कडून सोन्याचे दागिने किंमत 1 लाख 61 हजाराचा माल जप्त केला . दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी समीर मुनिर खां पठाण , शुभम सुधाकर रामटेके यांना अटक करीत त्याचेंजवळून 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . पुरात अडकलेल्याया नागरिकांना मदत करायचे सोडून त्यांचे घर फोडणारे आरोपींना अटक करण्यात आली आहे . ज्यामध्ये आरोपी करन ओमप्रकाश टंडन जवळून 15 हजार रुपयांचा मुद्देमाल , दुसऱ्या गुन्ह्यात याच आरोपी जवळून मूर्तीचे मंगळसूत्र किंमत 15 हजार रुपये जप्त करण्यात आले . विधी संघर्ष बालकाकडून 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त , उमाकांत सुनील उदासीन 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . सदर कारवाई यशस्वीपणे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे , उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे , सपोनि हर्षल एकरे , पोउपनी विनोद भुरले , रजनीकांत पुठ्ठावार , पेतरस सिडाम , मर्सकोल्हे , विनोद यादव , किशोर वैरागडे , आनंद खरात यांनी पार पाडली .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here