===============================
वरोऱ्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन =============================== *वरोरा* ============================== महाकवी वामनदादा कर्डक विचार मंच वरोऱ्याच्या वतीने बुद्ध पौर्णिमा व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि.२५/०५/२०२४ रोजी स. १०: ००वाजता स्थळ ,नगर भवन वरोरा येथे खुली बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा व निमंत्रितांचे भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे ,कार्यक्रमाचे उद्घाटन नयोमी साटम (भापोसे) उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार प्रतिभाताई धानोरकर,वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्र हे राहणार आहेत प्रमुख अतिथी केशवराव ठमके (दादा), आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वरोरा, अहेतेशाम अली,माजी नगराध्यक्ष न.प वरोरा, सुशीलभाऊ देवगडे, नगरसेवक न. प भद्रावती (वंचित बहुजन आघाडी ) राजेश सोलापण ,जिल्हाध्यक्ष ,ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर , राजू चिकटे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा ,विलास नेरकर ,अध्यक्ष -वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र( राकाँ),मुकेश जीवतोडे, शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख (उबाठा ) करण देवतळे , प्रदेश सचिव -भाजपा युवा मोर्चा वरोरा, सुशीला भगत, सामाजिक कार्यकर्त्या आलापल्ली हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत प्रथम सत्रामध्ये खुली बुद्ध- भीम गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे सूत्रसंचालन हेमंत शेंडे ,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक चंद्रपूर हे करणार असून दुसऱ्या सत्रामध्ये धारदार कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कवी संमेलनाचे अध्यक्ष ईसादास भडके, महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक व ज्येष्ठ कवी चंद्रपूर ,विशेष अतिथी शोभाताई वेले, कवयित्री नागपूर हे उपस्थीत राहणार असून या कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन नरेंद्र सोनारकर, विद्रोही कवी बल्लारपूर हे करणार आहेत . आणि शेवटच्या पर्वामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करण्यात येत आहे यामध्ये दशरथ शेंडे ,आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते वरोरा,किरण साळवी, व्हर्चुअस बहुउद्देशीय संस्था भद्रावती ,चेतन शर्मा, सामाजिक कार्यकर्ते वरोरा, वंदना मून, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या वरोरा, अशोकजी गुरुवाले ,सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर यांचा समावेश आहे सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सुनिल शिरसाट ,अमर गोंडाणे, हितेश राजनहिरे ,भीमराव शेंडे ,सागर ढोके, पुष्पा साठे, निलेश वानखेडे, उषा मून , मेघा भालेराव ,योगेश खोब्रागडे यांनी केले आहे. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ≠===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,