*गुणवंत विद्यार्थी हे जिल्ह्याचे गौरव – आ. किशोर जोरगेवार*

0
46

*गुणवंत विद्यार्थी हे जिल्ह्याचे गौरव – आ. किशोर जोरगेवार*

*यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.*

 

विपरित परिस्थितीतही चंद्रपूरातील विद्यार्थी हा शिक्षण क्षेत्रात घवघवीत यश संपादीत करत आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक अडचणी सुटाव्यात यासाठीही आपले प्रयत्न सुरु आहेत. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे जिल्ह्याचे नाव लौकीक होत असुन हे गुणवंत विद्यार्थी जिल्ह्याचे गौरव आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

 

काल रविवारी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या दादासाहेब कन्नमवार सभागृह येथे 10 वी आणि 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातुन आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला राजिव गांधी अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य जावेद जाफर खान, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, शहर युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, शिक्षण विभागाचे प्रतिक शिवणकर, सायली येरणे, राशेद हुसेन, दुर्गा वैरागडे, भाग्यश्री हांडे, कौसर खान, विमल काटकर, सविता दंडारे, आशा देशमुख, नकुल वासमवार, अॅड. परमहंस यादव, अॅड. राम मेंढे, चंद्रशेखर देशमुख, मुन्ना जोगी, हेरमन जोसेफ, रुपेश पांडे, राम जंगम आदिंची उपस्थिती उपस्थिती होती.

 

यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, मानवी आयुष्यातील विद्यार्थी जिवन हे सर्वात सुंदर आहे. मात्र ते जबाबदारीचेही आहे. तुमचा आज हा उद्याचे भविष्य ठरविणार आहे. आजचे यश उद्याच्या भविष्याला दिशा देणार आहे. त्यामुळे परिश्रम करणे सोडु नका, आज तुम्ही ईतक्या मोठ्या क्रमांकाने उत्तिर्ण झाले आहात. त्यामुळे सहाजिक तुमच्याकडून तुमच्या परिवाराच्या आणि समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा तुम्हाला पुर्ण करायच्या आहेत. असे ते यावेळी म्हणाले.

 

लोकप्रतिनीधी म्हणुन माझ्याही काही जबाबदा-या आहेत. त्यापुर्ण करण्याच्या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहें. आमदारांना मिळणाऱ्या निधी पैकी मोठा निधी मी शिक्षण क्षेत्रावर खर्च करत आहे. गरिब गरजु विद्यार्थ्यांना निशुल्क अभ्यास करता यावा याकरिता मतदार संघात 13 सुसज्ज अभ्यासिका तयार करण्याचा आमचा मानस आहे. यातील 6 अभ्यासीकांचे काम प्रगतिपथावर आहे. तयार होत असलेल्या या अभ्यासिकांचा विद्यार्थ्यासाठी उपयोगी ठरणार असा मला विश्वास आहे. बाबुपेठ येथील अभ्यासिकेला आपण नुकतेच पाच लक्ष रुपयांची पुस्तके उपलब्ध करुन दिली आहे. अनेक ठिकाणी आपण संगणक आणि पुस्तके उपलब्ध करुन देत आहोत. येथील विद्यार्थ्याला निशुल्करित्या उत्तम अभ्यास करण्यात हाच आमचा मानस असल्याचे ते यावेळी म्हणाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांवरही आता मोठी जबाबदारी असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पुढील शिक्षण कोणत्या क्षेत्रात करावे असे अनेक प्रश्न आता पालकांपुढे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी आपण नितेश कराळे सर यांना आमंत्रीत केले आहे. 17 जुलैला राजिव गांधी सभागृहात त्यांचा मार्गदर्शन कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उपस्थित राण्याचे आवाहणही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे. या कार्यक्रमात 10 वी आणि 12 वितील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देउन सत्कार करण्यात आला.

 

*हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बदल यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने वैशाली मद्दीवार यांचा सत्कार*

यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या सक्रिय कार्यकर्त्या वैशाली मद्दीवार यांना हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ्याच्या वतीने त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here