सततच्या पावसामुळे घरांच्या पडझड झालेल्या कुटुंबांना कल्याणी किशोर जोरगेवार यांनी पाहणी करून केली आर्थिक मदत.

0
160

दिनांक :- १२/०७/२०२२

गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे शहरातील अणेक घरांची पडझड झाली आहे. काही नागरिकांचे पावसामुळे घर जमीनदोस्त झाले असल्याने नागरिकांनी पावसाळ्यातच आपला निवारा गमावला आहे. त्यामुळे आज कल्याणी किशोर जोरगेवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील अनेक भागाची पाहणी करुन नुकसाणग्रस्त कुटुंबांना आर्थिक व किराणा व राशन कीटची मदत करण्यात आली.

चंद्रपूर शहरात मागील चार दिवसांपासून पावसाने जोर मारला आहे. सोसाटयाच्या वा-यासह पावसाला सुरुवात झाली. काही कळण्याअगोदर पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची तारांबळ उडाली तर अणेक घरांचे यात नुकसाण झाले. या पावसात राजीवगांधी नगर येथील महेंद्र झाडे, बगडखिडकी येथील विष्णू टेकाटे, भिवापूर वार्डातील मोहन रामटेके, बाबूपेठ वार्डातील हेमंत ठेंगरी यांच्या घराच्या भिंती व छत उडाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसाण झाले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या निर्देशानुसार परिसरातील पडझड झालेल्या घरांची पाहणी करून तात्काळ आर्थिक मदत तसेच किराणा व राशन किटची मदत करण्यात आली. यावेळी महानगर अध्यक्ष, पंकज गुप्ता, शहर संघटक विश्वजित शहा, सायली येरणे, बंगाली आघाडीच्या शहर अध्यक्षा, सविता दंडारे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष, सलीम शेख, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष, जितेश कुळमेथे, आदिवासी आघाडीच्या शहर अध्यक्षा वैशाली मेश्राम शहर संघटक राम जंगम, विक्की रेगंटीवार, दिनेश इंगळे, नंदा पंधरे, माधुरी निवलकर यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here