आधीच पाऊस पुराने बेजार त्यात चोरांचा वार – पहाटेच्या सुमारास दोन दुकानांचे शटर तोडून चोरी

0
241

भालचंद्र मेडिकल व येरणे किराणा दुकान फोडले – तक्रार नोंदवायला दहा वाजल्याानंतर येण्याचे पोलिसांचे निर्देश
आधीच पावसामुळे व त्यातल्यात्यात पुरामुळे बेजार असलेल्या नागरिकांना चोरांचा वार सहन करावा लागतो की काय अशी स्थिती चंद्रपूर शहरात निर्माण झाली असुन दुकानात झालेल्या चोरीची सकाळीच तक्रार द्यायला गेलेल्या पिडीत व्यक्तीला तक्रार द्यायला दहा वाजल्या नंतर येण्याचे आदेश शहर पोलिसांनी दिल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार नुसार शहरातील पठाणपुरा मार्गावर येरणे ह्यांचे सागर किराणा व मिलिंद गंपावार ह्यांचे भालचंद्र मेडिकल असुन चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास ह्या दोन्ही दुकानांचे शटर वाकवून चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. सागर किराणा चे संचालक येरणे हे सकाळीच आपले दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. मात्र त्यांनी कसेबसे शटर उघडुन दुकानात जाऊन बघितले असता त्यांच्या दुकानातील रक्कम चोरीला गेल्याचे प्रथादर्षणी लक्षात आले. वृत्त लिहीत असेपर्यंत भालचंद्र मेडिकल चे संचालक घटनास्थळी उपस्थित होते मात्र पोलीस आल्यानंतर दुकान उघडणार असल्याने त्यांच्याकडील काय चोरीला गेले हे कळू शकले नाही.
येरणे ह्यांनी आपल्या दुकानातील सीसीटिव्ही तपासले असता सदर चोरी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान झाली असुन चोरटे पहाटे पाच वाजता दुकानात शिरले व पाच मिनिटात चोरी करून बाहेर पडले. परिसरातील नागरिकांना घटनेबाबत विचारणा केली असता कुणीही चोरांना बघितले नसल्याचे सांगण्यात येत आहे मात्र सीसीटिव्ही मधे दोन चोरट्यांनी चोरी केल्याचे दिसत आहे त्यातील एक तरुण असुन एक प्रौढ असल्याचे दिसते. काल पठाणपुरा मार्गावर काही परप्रांतीय म्युझिक सिस्टिम व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू विकायला आले होते व त्यांनीच परिसराची रेकी करून चोरी केली असावी असा संशय व्यक्त केला आहे.

दुकानात झालेल्या चोरीची तक्रार द्यायला येरणे ह्यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली असता त्यांना गुन्हे शाखेचे कर्मचारी दहा वाजता येतील तुम्ही त्यानंतर येऊन तक्रार दाखल करा असे बजावण्यात आल्याचे येरणे ह्यांचे म्हणणे असुन पोलिसांच्या वागणुकीतून त्यांची नागरिकांबद्दल अनास्था व बेजबाबदार पणा दिसुन येतो असे परिसरातील लोकांचे म्हणणे असुन ह्याच अनास्थेमुळे चोर दूरवर पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही नागरिकांचे म्हणणे आहे हे विशेष.

संपादक शशि ठक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here