पुरग्रस्तांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भोजन व्यवस्था आज तिसरा दिवस

0
151
पुरग्रस्तांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. भोजनव्यवस्थेचा आज तिसरा दिवस आहे. घरात पाणी शिरल्याने प्रशासनाच्या वतीने राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणी सदर भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
चंद्रपूरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक नागरिक बेघर झाले आहे. अशा नागरिकांसाठी प्रशासनाच्या वतीने अस्थायी निवा-याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी पुरेश्या सोयी सुविधा नसल्याने येथील नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना केल्या होत्या. त्या नुसार यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सदर ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. यात महाकाली कन्या शाळा, भिवापूर येथील माना प्राथमीक शाळा, शहिद भगतसिंग प्राथमीक शाळा, महात्मा फुले शाळा, ज्येष्ठ नागरिक संघ, अग्रसेन भवन, हिस्लाॅप स्कुल, किदवाई स्कुल, सरदार पटेल स्कुल, लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा, पुर्व प्राथमिक शाळा, नागाचार्य मंदिर, नेहरु स्कुल, लखमापूर मंदिर, फुले शाळा, रयमत नगर आदि ठिकाणचा समावेश आहे. इतर ठिकाणीही आवश्यक सोयी सुविधा नसल्यास यंग चांदा ब्रिगेेडच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादक शशि ठक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here