शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतीचे नुकसान झाल्यास सरकार देणार ‘इतकी’ रक्कम

0
114

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) पिकांचे दुष्काळ, वादळ, खराब हवामान, पाऊस, पूर इत्यादी धोक्यांपासून संरक्षण केले जाते. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना माफक दरात विमा संरक्षण देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत सुमारे ३६ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालाय.
केंद्र सरकारने खरीप हंगाम (Kharif season) २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान या योजनेअंतर्गत केले जाते. काढणीनंतर शेतीत ठेवलेल्या पिकांचे पावसामुळे किंवा आगीमुळे होणारे नुकसानही या योजनेत समाविष्ट आहे. आता वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसानही विमा संरक्षणात (Insurance coverage) समाविष्ट केलंय. ही योजना बहुतांश राज्यांनी स्वीकारली आहे.
अनेक राज्यांतील शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज भरावा लागतो. हा अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने करता येतो. जर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर ते पंतप्रधान पीक विमा योजनेच्या https://pmfby.gov.in या वेबसाइटवरून अर्ज करू शकतात. दुसरीकडे, ऑफलाइन अर्जासाठी शेतकरी जवळच्या बँक, सहकारी संस्था किंवा CSC (Common Service Centre) ला भेट देऊन अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांनी पेरणीच्या 10 दिवसांच्या आत विम्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे, त्यानंतर कोणतेही पीक विम्यासाठी पात्र मानले जाईल.
काय असेल आवश्यक कागदपत्रे ?

रेशनकार्ड
आधारशी लिंक केलेला बँक खाते क्रमांक
ओळखपत्र, शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
शेताचा गट क्रमांक
शेतकऱ्याचे रहिवासी प्रमाणपत्र (शेतकऱ्याचा ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र)
शेत भाड्याने घेतले असल्यास, प्रत शेतमालकाशी केलेला करार.
कोणत्या पिकासाठी किती रक्कम ?

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत

कापूस पिकासाठी रु. ३६२८२
भात पिकासाठी रु. ३७४८४
बाजरी पिकासाठी रु.१७६३९
मका पिकासाठी रु.१८७४२ आणि मूग पिकासाठी रु.१६४९७ प्रति एकर पीक विमा उतरवला जातो.

संपादक शशि ठक्कर

उप संपादक प्रदीप कुमार तपासे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here