जिल्ह्यातील पूरपरिस्थिती कायम – अनेक नागरिक झाले विस्थापित

0
87

जाणून घ्या कोणते मार्ग आहेत वाहतुकीस बंद जिल्ह्यात पावसाने सर्वत्र थैमान घातले असुन अनेक तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन अस्ताव्यस्त झाले असुन कित्येक नागरिक विस्थापित झाले आहेत. प्रशासन नागरिकांच्या सुविधेसाठी तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी अहोरात्र कार्य करत असुन अनेक सामाजिक संघटना सुद्धा प्रशासनाला सहकार्य करीत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यालाही पुराचा चांगलाच फटका बसला असुन तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क विस्कळीत झालं आहे. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 20 जुलै 2022 रोजी सकाळी 09.00 वाजता
1. चारवट, हडस्ती येथील ईरई नदीचे पुलावर जवळपास 7 ft पुराचे पाणी असल्याने दोन्ही गावाचा मार्ग बंद आहे.
2. बामणी येथील वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी वाढल्याने बल्लारपूर राजूरा हैदराबाद मार्ग बंद

3.मोजा दहेली येथे वर्धा नदी चे पाणी वाढल्याने येथील 20 कुटुंबातील सदस्य यांना शाळेत रात्री ठेवण्यात आले.

4.चारवट येथील 18 कुटुंबातील सदस्य यांना नवीन चारवट येथे स्थलांतरित करण्यात आले.

5. बल्लारपूर येथील सर्व कोल माईन्स दिनांक 29.7.22 पासून संपूर्ण बंद ठेवण्यात आले आहे.

6.आज दिनांक 20 /7/22 रोजी बल्लारपूर तालुक्यातील बंद असलेले मार्ग खालिल प्रमाणे
1) बल्लारपूर – राजुरा हैदराबाद
2) बल्लारपूर सास्ती राजूरा
3) बल्लारपूर -विसापुर
4) पळसगाव -कवळजयी
5) हडस्ती -चारवट (पर्यायी मार्ग नाही)
6) चारवट -माना चंद्रपुर (पर्यायी मार्ग नाही
7) विसापूर ते नांदगाव
8) कोठारी ते तोहोगाव

हडस्ती, चारवट, जुनी चारवट, येथे सभोवताल परवा रात्री पासून पुराचे पाणी असल्याने संपर्क तुटला.

संपादक शशि ठक्कर

प्रदीप कुमार तपासे यांना उपसंपादक पदाचा राजीनामा दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here