बल्लारपूर शहरात फॉगिंगची व्यवस्था करणे हेतू. -आम आदमी पार्टी, बल्लारपूर

0
80

आम आदमी पार्टी, बल्लारपूर, शहर संयोजक रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शना खाली 20 जुलै 2022 रोजी शहर सहसंयोजक अफजल अली यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले, पावसाळा सुरू झाला आहे, बल्लारपूर शहरात अनेक नाल्या खड्डे भरले आहेत, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा झुडपेही वाढली आहेत, याकडे सफाई कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे.महिलांना सकाळ-संध्याकाळ घरी काम करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून शहरातील नागरिकांना डेंग्यू, मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांनी ग्रासले असून, शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची झुंबड पाहायला मिळत आहे. , डेंग्यू या आजाराने अनेक तरुणांना जीव गमवावा लागत असल्याने बल्लारपूर शहरातील कचरा, झुडपे साफ करून, साचलेल्या पाण्यात औषध फवारणी करून, प्रत्येक नागरिकाच्या जीवाचे रक्षण करणे ही शासन व प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे, त्वरीत नियोजन करून संपूर्ण शहरात फॉगिंग करण्यात यावी.

निवेदन देताना शहर सहसंयोजक अफजल अली, शहर महिला सह संयोजिका सलमा सिद्दीकी, शहर सचिव ज्योताताई बाबरे, संघटन मंत्री सरिताताई गुजर, दुर्गाताई शेंडे, रोहित जंगमवार, प्रशांत गदाला आणि इतर अनेक क्रांतिकारी साथी उपस्थित होते.

संपादक शशि ठक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here