पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात पोहचली आर्मी

0
110

चंद्रपूर / भद्रावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पुरजन्य स्थिती निर्माण झाली आहे . पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात CDRF आधीपासून काम करीत आहे मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने SDRF व आर्मीच्या NDRF चमूला चंद्रपूर जिल्ह्यात बोलाविण्यात आले आहे .
भद्रावती तालुक्यातील मानगाव व तळेगाव येथे गावकऱ्यांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यासाठी मेजर भुवन शाह यांच्या नेतृत्वाखाली गार्डस रेजिमेंटल सेंटर कामठी येथील सैन्य दल आवश्यक उपकरणासहित पूरग्रस्त भागात दाखल झाले
लष्करी बचाव पथक व चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चमूने संयुक्त रित्या 113 गावकऱ्यांची सुखरूप सुटका केली .
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी 25 जवानांची लष्करी चमू तयार ठेवण्यात आली आहे . NDRF TEAM 20 जुलै 2022 रोजी पहाटेच्या सुमारास माणगाव , जिल्हा चंदरपूर या गावात लष्कराचे बचाव कार्य सुरू झाले . पुरामुळे गाव पूर्णपणे तुटले आहे लष्करी बचाव पथक नागरी अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या संयोगाने सतत कार्यरत आहे 20 जुलै 2022 पर्यंत 113 गावकऱ्यांची सुरक्षित ठिकाणी सुटका करण्यात आली . पूरस्थितीनुसार पुढील गरज भासल्यास प्रतिसाद देण्यासाठी कामठी कॅन्टोन्मेंट येथे एक टीम तयार ठेवण्यात आली आहे . ब्रिगेडियर दीपक शर्मा , कमांडंट , जीआरसी यांनी सैन्याने केलेल्या ऑपरेशन्सचे निरीक्षण करण्यासाठी घटनास्थळांना भेट दिली .
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संततधार आणि मुसळधार पाऊस आणि सिंचन प्रकल्पांमधून पाणी सोडल्याने नागपूर उपविभागातील चंद्रपूर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे . एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या या भागात कार्यरत होत्या

संपादक :- शशी ठक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here