चंद्रपूर जिल्ह्यात 30 जुलै पर्यंत 37 ( 1 ) व ( 3 ) कलम लागू

0
109

चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय पक्ष , कामगार संघटनांचे आंदोलन , जातीय सामाजिक संघटनांकडून करण्यात येणारे आंदोलन , निदर्शने , मोर्चा , अतिमहत्वाचे व्यक्तीचा दौरा तसेच सध्या देशात व राज्यातील चालू घडामोडी संबधाने तसेच जिल्ह्यात होणारी विविध राजकीय , सामाजिक , जातीय कार्यक्रम , आंदोलने व निदर्शने आदी कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात दि . 15 जुलै ते 30 जुलै 2022 च्या रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 1 ) व ( 3 ) लागू करण्यात येत आहे . असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे .
या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे . तरी सदर कालावधीत कोणतीही व्यक्ती शस्त्र , सोटे , तलवारी , भाले , दंडे , बंदुका , सुरे , काठ्या , लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे , कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे , जमा करणे किंवा तयार करणे व्यक्तीच्या आकृत्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे , जाहीरपणे घोषणा करणे , गाणी म्हणणे वाद्य वाजविणे , तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे , हावभाव करणे , चित्रे , चिन्हे फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे , त्यांचे प्रदर्शन करणे त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात येत आहे . Chandrapur police तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही सभा मोर्चा , उत्सव व मिरवणुका काढू नये . पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी , रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही . याची नोंद घ्यावी . सदर आदेश दि 15 जुलै ते 30 जुलै 2022 चे रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील . असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित

केलेल्या आदेशात नमूद आहे .

संपादक :- शशी ठक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here