अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत मुख्यध्यापक बळी , तर सोबतचे सहकारी शिक्षक गंभीर जखमी

0
68

अहेरी : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने खासगी आश्रमशाळेचा मुख्याध्यापक ठार झाल्याची घटना घडली आहे . तर , यात सहकारी शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना 25 तारखेला सकाळी ॥ वाजताच्या सुमारास आलापल्ली- भामरागड मार्गावरील मिटकल फाट्यावर घडली . अपघातात मृत झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव किशोर मद्देर्लावार ( 53 ) आहे . तर , जखमी असलेल्या सहकारी शिक्षकाचे नाव रमेश गौरकर ( 50 ) आहे . मद्देर्लावार व गौरकर हे माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या राजे धर्मराव शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित मन्नेराजाराम येथील राजे धर्मराव आश्रम शाळेत कार्यरत होते . शाळेचे ऑडिट असल्याने दोघेही मोटारसायकलने मन्नेराजाराम गावाकडे जात होते . मिरकल फाट्यावर पोहचताच समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली . यात मुख्याध्यापक किशोर मद्देर्लावार जागीच ठार झाले तर , रमेश गौरकर गंभीर जखमी झाले .
गौरकर यांच्यावर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूरला रवाना करण्यात आले आहे . घटनेची माहिती आलापली परिसरात माहिती होताच सर्वत्र शोकाकूल वातावरण निर्माण झाले असून मृत झालेल्या मुख्याध्यापकांची पत्नी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत .

संपादक :- शशी ठक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here