गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

0
76

चंद्रपूर : समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे , विविध क्षेत्रातील माहिती व्हावी , तळागाळातील समाजबांधवांनी समाजामध्येच नाही तर देशामध्ये नाव कमवावे या उद्देशाने येथील धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूरतर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता .
जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या गुणवंतांचा यावेळी सत्कार करून त्यांची पाठ शाब्बासकीने थोपटण्यात आली . समाजातून झालेल्या सत्कारामुळे गुणवंत भारावले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज मंडळाचे अध्यक्ष अॅड . पुरुषोत्तम सातपुते होते . उद्घाटन चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ . अशोक जीवतोडे यांनी केले . यावेळी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र शासन वित्त व लेखाधिकारी व ज्ञानज्योती एज्युकेशन पूणेचे संस्थापक डॉ . विशाल भेदूरकर , प्रमुख अतिथी म्हणून विमाशिचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले , नायब तहसीलदार राजू धांडे , जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर , डॉ . सुरेश महाकुलकर , सर्च फाउंडेशनचे दिलीप झाडे , अतुल देऊळकर , पांडूरंग टोंगे , डॉ . प्रभाताई वासाडे , सुनिता लोढीया , महेश खंगार , विनोद पिंपळशेंडे आदींची उपस्थिती होती . सत्कार कार्यक्रमाप्रसंगी यशाची गुरुकिल्ली करिअर मार्गदर्शक पुरवणीचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले . याप्रसंगी अॅड . पुरुषोत्तम सातपुते , डॉ . अशोक जीवतोडे , सुधाकर अडबाले यांनी मार्गदर्शन केले .
समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह कोरोना काळात उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा कोरोनायोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला . यामध्ये डॉ . सचिन धगडी , डॉ . सौरभ राजूरकर , डॉ . विनोद मुसळे , डॉ . आशीष पोडे , डॉ . अमीत ढवस यांच्यासह ब्रिटिश सरकारची चेव्हनिंग स्कॉलरशिप मिळवणारे अॅड . दीपक चटप , आचार्य पदवी प्राप्त प्रा . डॉ . प्रविण भास्कर चटप , डोनेट कार्डचे सारंग बोबडे , मिस डीसी इंडिया पुरस्कार प्राप्त गायत्री सूर्यभान उरकुडे , हितेश गोहोकार , साईनाथ कुचनकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक प्रा . अनिल डहाके , संचालन व आभार प्रा . नामदेव मोरे यांनी केले . कार्यक्रमासाठी अरुण मालेकर , अॅड . विलास माथनकर , नामदेव मोरे , विजय मुसळे , अण्णाजी जोगी , सविता कोट्टी , गणपत हिंगाने , वासुदेव बोबडे , वसंत वडस्कर , सतीश मालेकर , भाऊराव निखाडे , लक्ष्मीकांत धानोरकर , संतोष देरकर , सतीश निब्रड , कौशिक माथनकर आदींनी परिश्रम घेतले .
आवडीचे क्षेत्र निवडा : डॉ . विशाल भेदूरकर विद्यार्थ्यांनो , आपल्याला करिअरसाठी क्षेत्र निवडताना कुणीतरी सांगितले म्हणून निवडले , असे न करता इच्छा असेल तेच क्षेत्र निवडा . करिअरसाठी विविध क्षेत्र आहे . आवडीचे क्षेत्र निवडताना प्रथम ज्या क्षेत्रात आपल्याला जायचे आहे , त्याचा अभ्यास करा . त्यातील बारकावे शोधा . त्यातील रोजगाराच्या संधी शोधा त्यानंतरच क्षेत्र निवडा . पालकांना आपल्या भविष्याची चिंता असते . त्यामुळे विचारपूर्वक क्षेत्र निवडण्याचा सल्ला यावेळी महाराष्ट्र शासन वित्त व लेखाधिकारी व ज्ञानज्योती एज्युकेशन पूणेचे संस्थापक डॉ . विशाल भेदूरकर यांनी विद्यार्थ्यांना दिला .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here