पावसाने घर कोसळल्याने नुकसान झालेल्या कुटुंबाला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आर्थिक मदत

0
31
पावसाने घर कोसळल्याने आर्थिक नुकसान झालेल्या सुंडेवाले या कुटुंबासाठी यंग चांदा ब्रिगेडने मदतीचा हात पुढे केला असुन सदर कुटुंबाची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे अल्पसंख्याक विभागाचे युथ प्रमूख राशेद हुसेन यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या स्थानिक पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.
   पावसामुळे चंद्रपूरात अनेक घरांची पडझर झाली आहे. सदर घरांची यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पाहणी करण्यात येत आहे. अनेकांच्या घराची पंचाणामे पुर्ण करण्यासाठीही यंग चांदा ब्रिगेड प्रशासनाच्या संपर्कात आहे. दरम्याण मागील तिन दिवस चंद्रपूरात झालेल्या पावसामुळे दुध डेरी भागातील सुंडेवाले यांचे घर कोसळले सदर घरात महिपाल सुंडेवाले, राधा सुंडेवाले आणि धनपाल सुंडेवाले हे तिन कुटुंब वास्तव्यास होते. घटनेच्या वेळी सुंटेवाले कुटुंबीयातील एक महिला घरात असल्याने ति किरकोड जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी घटनास्थळ गाठत पिडीत कुटुंबीयांना आर्थिक मदत केली आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here