राज्य सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणा च्या दृष्टीने निर्णय घेणार : सुधीर मुनगंटीवार भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून रक्षाबंधन कार्यक्रम सम्पन्न

0
53

स्त्री शक्ती ही जगातील सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. आदिशक्ती , मातृशक्ती अशा विविध रूपातून तिचे श्रेष्ठत्व कायम अधोरेखित झाले आहे. आज विविध पातळ्यांवर आमच्या भगिनींनी स्वतःला सिद्ध केले आहे. रक्षाबंधनाचा हा पवित्र संस्कार , त्या मागील भावना अधिक सशक्त करत भगिनींचा हा स्नेह पुढे नेत हे नाते अधिक दृढ करण्याचा मी प्रयत्न करेन असे प्रतिपादन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.भाजपा महिला आघाडी चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात श्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले , निराधार , विधवा , घटस्फोटीता ,दिव्यांग भगिनींसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मी अर्थमंत्री पदाच्या काळात घेतला होता. यापुढील काळात देखील राज्य सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणा च्या दृष्टीने निर्णय घेण्यात येतील असेही ते म्हणाले.

यावेळी भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी श्री सुधीर मुनगंटीवार सोबतच भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांना राख्या बांधल्या .

यावेळी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, सायरा शेख महामंत्री, शोभा पिदूरकर उपाध्यक्ष, अर्चना जिवतोडे उपाध्यक्ष, वैशाली बुद्धलवार उपाध्यक्ष, वंदना शेंडे उपाध्यक्ष, श्वेता वनकर उपाध्यक्ष, निलम सुरमवार उपाध्यक्ष, लक्ष्मी सागर मीडिया प्रमुख, सुलभा पीपरे, रजिया कुरेशी, मंजिरी रांजनकर, शुभांगी निंबाळकर, वंदना दाते, जोत्सना वनकर,दुर्गा बावणे, सुरेखा पाटील, वैशाली बोलमवार,भाग्यश्री भूमकर, नंदा कोटरंगे, रोहिणी ढोले, आकाशी गेडाम, उषा गोरंतवार, शारदा गुरनुले, अन्नू ठेंगणे, कल्पना घुमे, गुड्डी सहानी,साधना वनकर पुष्पा शेरकी सुचिता गाले, अनेक महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
  • संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here