चंद्रपूर शहराची ओळख नामशेष होण्याच्या मार्गावर ?

0
63

चंद्रपूर – 15 ऑगस्टच्या पूर्व संध्येला चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन अंचलेश्वर गेटच्या आतील असलेल्या छताचा भाग कोसळला .
एकीकडे स्वातंत्र्य दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चा जल्लोष सुरू आहे तर दुसरीकडे चंद्रपुरातील ऐतिहासिक वास्तुकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे . चंद्रपूर शहराची ओळख ही ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्यामुळे आहे मात्र या किल्ल्यांची आज दुरावस्था झाली आहे .
चंद्रपुरात मागील काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून या पावसाने किल्ल्याच्या अनेक भिंती कोसळत आहे . अनेक ठिकाणी उभ्या असलेल्या या वास्तूच्या भिंती कमकुवत झाल्या आहे , यामुळे नागरिकांना शक्यतोवर या भिंतीपासून लांब रहावे . कमकुवत झालेली किल्ल्यांच्या भिंतीची डागडुजी व्हावी यासाठी इको प्रो पाठपुरावा करीत आहे मात्र अजूनही इको प्रो च्या मागणीकडे संबंधित विभाग लक्ष देत नाही .
ज्या ठिकाणी ऐतिहासिक वास्तूच्या भिंती कमकुवत झाल्या असतील त्याठिकाणी प्रशासनाने युद्ध पातळीवर डागडुजी करायला हवी . शहरातील ऐतिहासिक वास्तू बाबत अनेक राजकारणी आपल्या भाषणात प्रामुख्याने उल्लेख करतात मात्र त्या वास्तूंची काय दुरावस्था झाली आहे याबाबत कधी कुणी काही बोलत नाही . 14 ऑगस्टला रात्री 10 च्या सुमारास अंचलेश्वर गेट मधील एका भागातील मोठे दगड खाली कोसळले , गेट मध्ये आश्रयास असलेली महिला बचावली .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here