स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राज्यात ‘ स्वराज महोत्सव ‘
सर्व नागरिकांनी जागेवर स्तब्ध उभे राहुन राष्ट्रगीत गाण्याचे शासनाचे आवाहन देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असून स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीपासून ह्या वर्षीच्या १५ ऑगस्ट पर्यंत अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान स्वराज महोत्सव साजरा करण्याचे घोषित केले होते . स्वराज महोत्सवाचा भाग म्हणुन महाराष्ट्र शासनाने १७ ऑगस्ट रोजी राज्यात समुह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम राबविण्याचे घोषित केले असून त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय , निमशासकीय , खाजगी कार्यालये , सर्व शाळा महाविद्यालये तसेच विद्यापीठांना समूह राष्ट्रगीत गायन अनिवार्य केले असुन राज्यातील इतर नागरिकांनी सुद्धा ते जिथे असतील तिथे सकाळी ११ वाजता स्तब्ध उभे राहुन राष्ट्रगीत गाण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793