गोंदिया जवळ प्रवासी रेल्वेची मालगडीला धडक

0
37

रेल्वे डबा रुळावरून घसरला

रायपुर कडून नागपुर कडे जाणाऱ्या भगत की कोठी नावाच्या प्रवासी रेल्वे गाडीला पहाटे 4:00 वाजताच्या दरम्यान गोंदिया जवळ चुलोद गुदमा येथे अपघात झाला असुन प्रवासी गाडीचा एक डबा रुळावरून घसरला आहे . ह्या अपघातात भगत की कोठी ह्या गाडीने प्रवास करणाऱ्या 50 प्रवाशांना दुखापत झाली असुन सुदैवाने अपघातात कुठलीही प्राणहानी झाली नाही . प्राप्त माहितीनुसार सदर प्रवासी गाडी रायपुर मार्गे नागपुर कडे जात असताना त्याच रुळावर असलेल्या मालगाडीला मागुन धडक दिली . अपघाताची माहिती मिळताच गावकरी तसेच रेल्वे प्रशासनाच्या मदतीने जखमी प्रवाशांना घसरलेल्या डब्यातून बाहेर काढण्यात आले व उपचारासाठी शासकीय तसेच विविध खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . वास्तविक बघता एखाद्या रेल्वे मर्गिकेवर दुसरी गाडी असताना त्या मार्गिकेवर इतर गाड्यांना सोडण्यात येत नाही मात्र ह्या ठिक मालगाडी असलेल्या मर्गिकेवर प्रवासी गाडीला हिरवा सिग्नल कसा देण्यात आला ? अशा बेजाबदारपणामुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात कसे टाकण्यात आले ? असे प्रश्न निर्माण होत असुन ह्या अपघाताला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here