पुन्हा वाघाचा हल्ला

0
27

चिमूर : – चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोन अंतर्गत पळसगाव वनपरिक्षेत्र मधील विहिरगाव परिसरात गावातील जनावरे चारन्याकरिता गेलेल्या सुरेश बाजीराव ढोणे ( ५५ ) या गुराखीवर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केले .
सदर घटना 21 ऑगस्टला सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान पळसगांव वनपरिक्षेत्र मधील विहिरगाव बिट क्रं २ मध्ये घडली . सदर जखमीला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे , घटनास्थळी , बनकर वनरक्षक , मेश्राम वनरक्षक , गेडाम , वनरक्षक , अजय बन्सोड , व वनमजुर उपस्थित होते .
जखमी व्यक्तीला वनविभागा कडून पाच हजाराची आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहिती पळसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी यांनी दिली आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here