आमदार किशोर जोरगेवार यांनी वेधले मतदार संघातील महत्वांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष

0
52

मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी पुरवनी मागणीवर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील महत्वाच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले असुन घुग्घुस आणि दिक्षाभुमीच्या विकासासाठी निधीची मागणी केली आहे.

मंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशाच्या तिस-या दिवशी चंद्रपूर मतदार संघातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील महत्वाचे विषय सभागृहात मांडले. यावेळी ते म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दोन ठिकाणी दिक्षा देण्याचा कार्यक्रम घेतला होता. त्यातील एक दिक्षाभुमी नागपूरला आणि दुसरी चंद्रपूरला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नागपूर येथील दिक्षाभुमीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. परंतु चंद्रपूरच्या दिक्षाभुमीचा विकास मात्र झालेला नाही. त्यामुळे कमीत कमी ५० कोटी रुपये तरी शासनाने या दिक्षामुमीच्या विकासाकरिता द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी बोलतांना केली. स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष सुरु आहे. ७५ वे वर्ष सुरु असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाचे एक सुंदर संविधान भवन चंद्रपूरमध्ये व्हावे अशी पुर्व विदर्भातील जनतेची भावना आहे. त्यामुळे येथे संविधान भवन निर्माण करण्यात यावे अशी मागणीही यावेळी बोलतांना त्यांनी केली आहे. चंद्रपूर महानगर पालिकेची हद्दवाढ करणे अत्यंत आवश्यक आहे. चंद्रपूर शहरालगत असलेल्या आरवट, मोरवा, चिंचाळा, खुटाळा, दुर्गापुर हे गावे महानगर पालिकेत येत नसल्याने या गावांचा अपेक्षीत असा विकास करता आलेला नाही. त्यामुळे महानगरपालिका हद्दवाढ करुन सदर गावांचा महानगर पालिकेत समावेश करण्यात यावा, ५० हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतीची नगर पालिका झाली. आता येथे काही प्रश्न आहेत. नगर पलिकेच्या कामकाजाला साजेल अशी सोयी सुविधायुक्त नवीन ईमारत येथे तयार करण्याची गरज आहे. त्यामुळे या ईमारती करिता व घुग्घुसच्या विकासाकरिता भरिव निधी द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. घुग्घुस येथुन जात असलेल्या बल्लारशाह – यवतमाळ मार्गाला घुघुस येथे वळण रस्ता देण्यात यावा. चंद्रपूर येथे महानगर पालिका आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णालय सुरु करण्यात यावे आदि मागण्यांकडे योवळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. चंद्रपूरातील प्रमुख मार्गांसाठी नगर विकास विभागाने पहिल्यांदा  एकत्रीतपणे २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आभार मानले आहे.

 

बॉक्स

 

अतिवृष्टीने घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना आता  हजारा एैवजी मिळणार १५ हजारांची शासकीय मदत

 

अतिवृष्टीने घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना मिळत असलेली ५ हजार रुपयांची शासकिय मदत अत्यंत कमी असुन ती वाढविण्यात यावी अशी मागणी पावसाळी अधिवशेनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. याची तात्काळ दखल घेत सदर मदत ५ हजाराहुन १५ हजार करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

 

यंदाचा पावसाळा चंद्रपूरकरांसाठी मोठे संकट घेउन आले. या पावसाने आलेल्या पुरानेझ अनेकांची शेतपिके पाण्या खाली गेली तर शहरातील अनेक घरांची पडझड झाली. त्यामुळे सदर कुटुंब उघड्यावरती आले. सदर घरांचे पंचनामे करुन त्यांना शासकिय मदत करण्यात आली. मात्र यातील अनेक घरे ही नजुलच्या जागेवर असल्याने त्यांना केवळ पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. ही मदत अत्यंत कमी आहे. त्यामुळे सदर पिढीत कुटुंबांना वाढीव मदत देण्यात यावी अशी मागणी काल अधिवेशनाच्या दिस-या दिवशी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. याची तात्काळ दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असुन आज बोलतांना त्यांनी सदर पिढीत कुटुंबांना मिळणारी पाच हजार रुपयांची मदत वाढवून १५ हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here