शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाला आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करुन दिल्या दोन इसिजी मशीन

0
107

दिलेला शब्द पाळत आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाला दोन इसिजी मशीन उपलब्ध करुन दिल्या असुन यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सदर दोन मशीन शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाकडे सुपुर्त केल्या आहे.

यावेळी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकीय निवासी अधिकारी निवृत्ती जिवने, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, परिचालीका प्रमुख विद्या पळसकर, घुग्घुस शहर संघटक विलास वनकर, शुभम जगताप, यंग चांदा ब्रिगेडच्या वैद्यकिय मदत विभागाचे राहुल खाडे आदिंची उपस्थिती होती.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकिय वैद्याकिय रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील अधिका-र्यांची बैठक घेतली होती. सदर बैठकीत रुग्णालयात इसिजी मशिनची कमतरता असल्याचे लक्षात आले होते. उपलब्ध असलेली मशीनही बंद अवस्थेत होती. त्यामुळे याची गंभिर दखल घेत आमदार किशोर जोरगेवार आमदार निधीतुन तात्काळ सहा इसिजी मशिन उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगीतले होते. यातील दोन मशीन काल बुधवारी शासकिय वैद्यकिय महविद्याल, रुग्णालयाला सुपुर्त करण्यात आल्या आहे. तर उर्वरित चार मशनरिही लवकरच शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, रुग्णालयाला उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here