शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, रुग्णालय येथे बैठक घेतली त्यावेळी येथील समस्यांची माहिती मिळाली. आपण लगेच याची दखल घेत दोन इसिजी मशीन उपलब्ध करुन दिल्यात. तर आज पिण्याच्या पाण्याच्या कॅन आपण उपलब्ध करुन दिल्या आहे. मात्र मी येथे आल्यावर येथील समस्यांची माहिती मला मिळते हे योग्य नाही. जसा रुग्ण त्यांच्या समस्येबाबत माहिती देत असतो तसेच रुग्णालय व्यवस्थापनानेही रुग्णालयातील समस्येंबाबत वेळोवेळी आम्हाला माहिती देणे अनेक्षीत असून व्यवस्थापनाच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्या आमच्या पर्यंत पोहचाव्यात असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगवार यांनी केले.
आज सोमवारी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे १०० पिण्याच्या पाण्याचे कॅन उपलब्ध करुन देण्यात आल्यात. सदर कॅन वितरन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, रुग्णालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे, निवासी वैद्यकिय अधिकारी निवृत्ती जिवने, परिचारिका प्रमुख विद्या पळसकर, रोटरी क्लबचे प्रकल्प प्रमूख अजय जयसवाल, यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंडारे, विमल काटकर, नंदा पंधरे, कौसर खान, कल्पना शिंदे, वंदना हजारे, शमा काजी, मयुर कलवाल आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, रुग्णालय हे रुग्णांच्या आशेच स्थान आहे. येथुन योग्य उपचार मिळेल असा विश्वास त्यांच्यात निर्माण करण्यासाठी येथील कर्मचा-र्यांचे प्रयत्न असले पाहिजे. हे काम करत असतांना रुग्णालयातील व्यवस्थेवरही त्यांचे लक्ष असले पाहिजे. रुग्णालयात अनेक उपकरणे बंद आहे. ही बाब गंभिर आहे. यामागची कारणे तपासुन ते पुन्हा सुरु गेल्या गेले पाहिजे. या प्रक्रियेत अडचणी येत असल्याच त्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनीधी म्हणुन आम्ही प्रयत्न करणार, केवळ आपण ही अडचण आमच्या लक्षात आणून देने गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले,
मागच्या वेळेस आपण येथे बैठक घेत येथील समस्यांबाबत चर्चा केली होती. त्यांनतर रुग्णालय पातळीवर सोडविता येणाऱ्या अडचणी आपण सोडविल्या आहेत. तर इसिजी मशीन आपण उपलब्ध करुन दिल्या आहे. पहिल्या टप्यात दोन मशीन उपलब्ध करुन दिल्यात तर आनखी चार मशीनी येत्या महिण्याभरात उपलब्ध होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
येथे रुग्णांसाठी व डॉक्टरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आपण येथे पिण्याच्या पाण्याच्या कॅन उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला होता. आज हा शब्द पूर्ण करता आला याचा आनंद आहे. आपण रुग्णालयातील प्रत्येक वार्डात पाच कॅन अशा एकंदरित १०० कॅन आज रुग्णालयाला देत आहोत. या कमी पडल्यास आनखी देऊ असेही ते यावेळी म्हणाले. रुग्णालयाला शासकिय निधी अंतर्गत आपण मदत करुच पण मानवी भावनेतुनही रुग्णालयाची व्यवस्था उत्तम करण्यासाठी शक्य ती मदत आमच्याकडून केल्या जाईल असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयातील अधिकारी कर्मचा-र्यांची उपस्थिती होती.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793