आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते वृंदावन नगर आणि तुलसी नगर येथील विकासकामांचे भुमिपूजन

0
39

विविध निधी अंतर्गत शहरात विकास कामे सुरु आहे. दरम्याण आज सोमवारी खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर  वृंदावन नगर आणि तुलसी नगर येथील विकासकामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विधीवत भुमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक सुभाष कासनगोटटूवार, यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक विभागाचे राशेद हुसेन, विश्वजित शाहा, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, विलास वनकर, यंग चांदा ब्रिगेडच्या वार्ड संघटिका शांता धांटे, वार्ड संघटक दिनेश इंगळे, अविनाश रांखुडे, रमेश वनकर, वसीम खान, देवतळे, मानकर, कूळे, निलेश सहारे, विशाल माळोत, कवळु धांटे, रामदेव ढिवसे,  दोनाजी इंगळे, भुषन साव, माला रामटेके, राहुल पावडे, आदिंची उपस्थिती होती.

चंद्रपूर मतदार संघात विविध निधी अंतर्गत विकासकामांना गती मिळाली आहे. या भागाच्या विकासासाठी नगर विकास विभाग, खनिज विकास निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शहरातील अनेक भागात विकासकामांचे भुमिपूजन सुरु आहे. दरम्याण खनिज विकास निधी अंतर्गत वृंदावन नगर आणि तुलसी नगर येथील सिमेंट कॉक्रिट रोड व नालीचे काम मंजूर करण्यात आले आहे. सदर विकास कामांचे आज येथील नागरिकांच्या उपस्थितीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.

चंद्रपूरातील अनेक भागात विकासकामे सुरु आहे. हे काम होत असतांना आवश्यक कामे झाली पाहिजे यावर आमचा भर आहे. मतदार संघातील नागरिकांचे काम करत त्यांचे समाधान करणे हे महत्वाचे आहे. हि नविन वस्ती आहे. मागील पाच वर्षात या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे विकास कामांची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण येथे निधी दिला आहे. येथील नागरिकांनी तुलसिनगर येथील समस्यांचे निवेदन दिले आहे. येत्या काळात येथील विकासकामेही आम्ही करु असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागकरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here