पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी केला आमदार किशोर जोरगेवार यांचा

0
37
  1. आ. जोरगेवार यांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांना मिळाला कॅरिऑन

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांमुळे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमातील प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थांना कॅरिऑन मिळाला तर तृतीय वर्षातील विद्यार्थांसांठी लेखी परिक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे. त्यामुळे आज पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला आहे. यावेळी माजी नगर सेवक बलराम डोडाणी, यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाचे प्रमुख प्रतिक शिवणकर, शहर संघटक करणसिंग बैस यांची उपस्थिती होती.

अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आला. आणि परीक्षा मात्र लेखी स्वरुपात घेण्यात आली असल्याने तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमातील बहुतांश विद्यार्थी अनुतीर्ण झाले होते. त्यामुळे निकालात दुरुस्ती करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना केली होती. याची ना. चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत यावर तोडगा काढत तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमातील अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थांची लेखी परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तृतीय या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला. मात्र प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. चंद्रकांत पाटिल यांच्याशी दुरध्वनी वरुन संपर्क साधत सदर बाब त्यांच्या लक्षात आणुन दिली. त्यानंतर याची दखल घेत पॉलिटेक्निकच्या प्रथम आणि द्वितिय वर्षातील विद्यार्थ्यांना कॅरिऑन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पॉलिटेक्नीकच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले आहे.

दरम्याण आज पाॅलिटेक्निच्या विद्यार्थ्यांनी कार्यालयात आ. जोरगेवार यांची भेट घेत शाल, शिफळ आणि पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांनी त्यांची ही समस्या माझ्या लक्षात आणुन दिली होती. यावर बोलण्यासाठी अधिवेशानात संधी मिळाली नाही. मात्र मी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबई येथे भेट घेत विद्यार्थ्यांची मागणी त्यांच्या लक्षात आणुन दिली. याची दखल घेत त्यांनी  विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याची मला जाण आहे. अभियांत्रीकी शाखेच्या विद्यार्थ्यांचीही आता लेखी परिक्षा घेतल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असून आपण मतदार संघात १३ अभ्यासिका तयार करत आहोत. विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकांचा लाभ घ्यावा असे आवाहण यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here