महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने महारष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुडे यांच्या चंद्रपूरचा दौरा असताना ऑटोरिक्षा संघटनेतर्फे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री श्री. हंसराजजी अहीर यांचेही स्वागत करण्यात आले. श्री. चंद्रशेखर बावणकुडे काही दिवसापूर्वी स्वतः ऑटोरिक्षा चालवित असल्यामुळे ऑटोरिक्षा चालकांमध्ये प्रदेश अध्यक्ष झाल्यामुळे मोठा उत्साह निर्माण झाल्यामुळे त्यांचा चंद्रपूरला दि. ०२.०९.२०२२ रोजी चंद्रपूरला दौरा असल्याचे कळताच महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, संघटन प्रमुख विनोद चन्ने, सचिव सुनिल धंदरे, कोषाध्यक्ष रवी आंबटकर, राजु मोहुर्ले, प्रशांत वानखेडे, हरिदास नागापूरे, विलास बावणे, रमेश वझे, किशोर वाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य भाजपाचे प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुडे यांचा चंद्रपूर जिल्हयात जंगी स्वागत करण्यात आले. तसेच संघटनेचे उपाध्यक्ष जहीर शेख, जाकीर शेख, कुंदन रायपुरे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793m