यवतमाळ : धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष देणे कठीण झाले आहे. लहान्या पासून तर मोठ्या पर्यंत आरोग्याची काळजी घेत नसल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे काळानुसार सर्वानी आरोग्याबाबत तडजोड न करता आरोग्यासाठी वेळ काढण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.
आज वणी तालुका काँग्रेस कमेटी व शिवभक्त मंडळ कायर स्वास्थ सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित भव्य मोफत महाआरोग्य शिबिरात व काँग्रेस शेकडो युवकांनी प्रवेश घेतला याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सदस्य डॉ. महेंद्र लोढा, माजी सभापती तथा मुख्य समनव्यक महाआरोग्य शिबीर पुरुषोत्तम चौधरी, झरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आशिष कुलसंगे, वणी तालुका काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण काकडे, डॉ. पंकज हरकुट, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. प्रतीक उत्तरवार, डॉ. निखिल खोब्रागडे, डॉ. अमित देशपांडे, डॉ. गणेश लिमजे, डॉ. सुरज चौधरी, शिरीष कुमारवार यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, सर्वसामान्य, गोरगरीब, गरजू रुग्णापर्यंत आरोग्य व्यवस्थेने पोहोचून त्यांना आरोग्य सेवेचा लाभ देणे आवश्यक आहे. गरिबातल्या गरिबाला दर्जेदार आरोग्य सुविधा देणे शासनाचे कर्तव्य असून त्यांनी जबाबदारी चोखपणे पार पडली पाहिजे असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
त्यासोबतच महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून विविध आजारांवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. तरीसुद्धा स्वतःजवळचा असलेला पैसा खर्च करून लोक खाजगी रुग्णालयात जात असल्याचे निदर्शनास येते. हे चित्र बदलविणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करून समर्पक भावनेने सेवा दिली तर लोकांचा ओढा निश्चितच वाढेल. या दृष्टीने आरोग्य विभागाने काम करावे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793