- रहमत नगर येथील एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मदतीचा हात पुढे करीत आर्थिक सहाय्य केल्याने परिसरात याची चर्चा आहे.त्या महिलेला भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांचे हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला.
किमान 10 दिवसांपूर्वी रेहमत नगर येथील एक कालबाह्य झालेली 3 मजली इमारत पत्त्याच्या घरासारखी कोसळली.यात शाहिस्ता अयुप शेख ही गंभीर जखमी झाली. हे वृत्त कळताच महानगरातील कालबाह्य इमारतींचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्री व वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिले.त्याच वेळी त्यांनी जखमी शाहीस्ताची विचारपूस करीत,मदतीचे वचन दिले होते.ठरल्या प्रमाणे भाजपा पदाधिकाऱ्यांनीं मदत देऊन अयुप शेख कुटुंबाचे सांत्वन करण्यात आले.
यावेळी मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, रवी लोणकर, सचिव चांदभाई पाशा, महिला पदाधिकारी रेणुका घोडेस्वार,मोनिषा महातव, युवा पदाधिकारी साजिद शेख, अमित निरंजने यांची उपस्थिती होती
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793