मंगळवार 25 ऑक्टोबर 2022 रोजी आम आदमी पार्टी बल्लारपूर शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सचिव रोहित जंगमवार यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या वसंत वाचनालयाच्या दुरवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. बल्लारपूरच्या सुमारे १ लाख लोकसंख्येमध्ये हजार ते पंधराशे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यातही 450-500 विद्यार्थी वेगवेगळ्या वाचनालयात अभ्यास करतात. याची माहिती नगरपरिषदेला असतानाही करोडो रुपये खर्चून बांधलेल्या वसंत वाचनालयात केवळ 40 ते
50 जणांची बसण्याची व्यवस्था का?वाचनालयातील 5 कर्मचाऱ्यांच्या पगारावर महिन्याला लाखोंचा खर्च होतो, पण मग शहरातील सर्वच विद्यार्थ्यांना वाचनालयाचा लाभ का होत नाही? नव्याने बांधलेल्या इमारतीत जुन्या, धुळीने माखलेल्या पुस्तकांचा ढीग का आहे? चालू घडामोडी मासिक का उपलब्ध नाही? विद्यार्थ्यांना 12 ते 15 तास अभ्यास करावा लागतो, मात्र ऑफिशियल वेळेपासून वाचनालय उघडले आणि बंद केले जात असेल तर त्याचा उपयोग काय?विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररी रोज का उघडली जात नाही? असे अनेक प्रश्न रोहित जंगमवार यांनी उपस्थित केले आणि त्याचवेळी या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही देण्यात आला.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793























