चंद्रपुर
*कबीर हितेश सूचक ह्याचा सत्कार*
अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत पदकं पटकविणाऱ्या, अतिशय लहान वयात इंडिया आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये आपले नाव नोंदविणाऱ्या कबीर हितेश सूचक ह्याला नुकतेच *छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2022* ने सन्मानित करण्यात आले. दिनांक 01/11/22 रोजी शिर्डी जवळील वैजापूर ह्या गावी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या क्षेत्रात असामान्य प्रतिभा असणाऱ्या राज्यभरातील फक्त निवडक 51 लोकांना हा पुरस्कार देण्यात आला होता. कबीर ला सुध्दा हा पुरस्कार त्याच्या लहान वयातील उत्कृष्ट कामगिरी मुळे देण्यात आला.
हा पुरस्कार त्याला श्री सम्राट सिंग राजपूत ( एस.पी. वैजापुर आणि शिर्डी) आणि सुर्यकांत मोटे ह्यांच्या हस्ते देण्यात आला. लहान वयात मिळालेल्या ह्या पुरस्कारामुळे कबिरचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे. कबीर ने आपल्या यशाचे श्रेय आपले आजी आजोबा, आई, बाबा, काका, काकू आणि त्याचे शिक्षक ह्यांना दिले आहे……
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793