जिल्‍हयातील मच्‍छीमारांचे प्रश्‍न मार्गी लावणार – मस्‍त्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्‍वाही

0
29

मच्‍छीमार बांधवांच्‍या न्‍यायोचित मागण्‍यांची प्राधान्‍याने पुर्तता करण्‍यात येईल, मच्‍छीमार बांधवांच्‍या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून त्‍यांच्‍यावर अन्‍याय होवू देणार नाही, अशी ग्‍वाही मस्‍त्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दिनांक ८ नोव्‍हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे संपन्‍न झालेल्‍या बैठकीत मस्‍त्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्‍हा मच्‍छीमार संघटनेचे अध्‍यक्ष पांडूरंग गेडाम, वाल्‍मीकी मत्‍स्‍यपालन मुलचे प्रतिनिधी, सहाय्यक मस्‍त्‍यव्‍यवसाय अधिकारी, चंद्रपूर निखील नरड, नंदू रणदिवे, जितु टिंगुसले, गणेश मेश्राम, अजय पोहनकर, राजू जराटे, पंकज शेंडे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

गेल्‍या बरेच दिवसांपासून मारेमारी बंद असल्‍यामुळे मच्‍छीमारांची होणारी आर्थीक परवड व तलाव नुतनीकरण या विषयांच्‍या अनुषंगाने प्रामुख्‍याने चर्चा झाली. यासंदर्भात येत्‍या १० नोव्‍हेंबर २०२२ रोजी नियोजन भवन चंद्रपूर येथे सविस्‍तर बैठकीचे आयोजन होणार असून जिल्‍हाधिकारी विनयकुमार गोडा, सहाय्यक निबंधक, जिल्‍हा उपनिबंधक यांच्‍या उपस्थितीत ही बैठक संपन्‍न होणार असून जिल्‍हयातील सर्व मच्‍छीमाराचे प्रश्‍न मार्गी लागतील व यासंदर्भात आपण स्‍वतः जातीने लक्ष देवू, अशी ग्‍वाही मस्‍त्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here