दुर्गापूर निर्घुण हत्याकांडातील 8 संशयीत आरोपीतांना वर्धा कडे स्कॉर्पीओ वाहनाने पळुन जात असतांना पाठलाग करून आरंभा टोल नाका, जिल्हा वर्धा येथून काही तासात घेतले ताब्यात.
दिनांक 07/11/2022 रोजी 22:30 वा. ते 2245 वा चे सुमारास पो.स्टे. दुर्गापूर हद्दीत ईमली बार व नायरा पेट्रोलपंप समोर दुर्गापूर रोडवर पूर्व वैमन्यस्यातून 7 ते 8 इसमांनी मृतक नामे महेश मेश्राम रा. दुर्गापूर हा ईमली बार येथे मित्रा सोबत गेला असतांना नमुद आरोपीतांनी त्यांचेवर पाळत ठेवून घेराव घालून धारदार घातक शस्त्रांनी वार करून जियानीशी ठार केले व त्याचे शिर निर्दयपणे धडावेगळे करून घटनास्थळापासून अंदाजे 50 मिटर दूर फेकून पळून गेले. अशा रिपोर्ट दुर्गापूर पोलीस स्टेशनला अप क. 189/ 2022 कलम 302, 143, 147, 149, 427 भा.द.वी. सह कलम 4. 25 भारतिय हत्यार कायदा अन्यये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सदर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पो. उपनि अतुल कावळे यांचेसह अंमलदारांची चार विशेष शोध पथके गठीत करण्यात आली. सदर पथकांनी अज्ञात आरोपीतांचे नांव व त्यांचे ठावठिकाणा बाबत गोपनिय माहिती प्राप्त करून तांत्रीक तपास केला असता यातील संशयीत आरोपीत इसम हे वर्धा जिल्हयात स्कॉर्पीओ गाडीने पळून जात असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्यावरून लागलीच सदर वाहनाचा माग काढून स्थागुशा के सपोनि कापडे व सपोनि भोयर यांचे पथकांनी पाठलाग करून सदर स्कॉर्पीओला आरंभा टोल नाका, जिल्हा वर्धा येथे दोन वाहने आडवे लावून अडविले व योग्यती काळजी घेवून शिताफीने वाहनामधील संशयीत नामे 1) अतुल मालाजी अलीवार, वय 22 वर्ष रा. समता नगर वार्ड के 6 दुर्गापुर, 2) दिपक नरेद्र खोब्रागडे, वय 18 वर्ष रा. समता नगर वार्ड के 6 दुर्गापुर, 3) सिध्दार्थ आदेश बन्सोड, वय 21 वर्ष रा नेरी दुर्गापुर, (4) संदेश सुरेश चोखान्द्रे, वय 19 वर्ष रा सम्राट अशोक वार्ड क 2 दुर्गापुर चंद्रपुर, 5) सुरज दिलीप शहारे वय 19 वर्ष रा. समता नगर वार्ड के 6 दुर्गापुर, 6) साहेबराव उत्तम मलिये वय 45 वर्ष रा मेरी समतानगर वार्ड के 6 दुर्गापुर 7) अजय नानाजी दुपारे वय 24 वर्ष रा उर्जानगर कोडी दूर्गापुर व 8) प्रमोद रामलाल सुर्यवंशी, वय 42 वर्ष, राउजीनगर दुर्गापुर अशा एकूण 8 संशयीत आरोपीत इसमांना स्कॉर्पीओ वाहनासह गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासात ताब्यात घेतले.
सदर संशयीत आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेत आणुन त्यांचेकडे गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता यातील सराईत आरोपी क्र. 1 ते 6 यांचा सदर गुन्हयात प्रत्यक्ष सहभागी असून यातील आरोपी क्र. 7 व 8 यांनी आपले ताब्यातील चारचाकी स्कॉर्पीओ वाहन क्र. एम.एच. 04 जिझेड 9091 नी वरिल नमुद अरोपीतास पळून जाण्यास मदत केली असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत असल्याने नमुद आरोपीतांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन दुर्गापूर यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे स.पो.नि. जितेंद्र बोबडे, स.पो.नि. संदीप कापडे, स.पो.नि. मंगेश भोयर, पोउपनि कावळे, पो.हवा. संजय आतकुलवार, धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, नितीन साळवे, ना. पो. कॉ. सुभाष गोहोकार, संतोष येलपुलवार, जमीर पठाण, मलिंद चव्हाण, गजानन नागरे, अजय बागेसर पो.कॉ. गोपाल आतकूलवार नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, मिलींद जांमुळे, प्रशांत नागोसे, गोपीनाथ नरोटे, महीला अंमलदार अपना मानकर तसेच सायबर पोस्टे येथील पोहवा मुजावर अली यांनी केली आहे. सदरची बातमी आपल्या लोकप्रीय चैनल तथा वृत्तपत्रांमध्ये प्रकाशीत करण्यास सादर आहे..
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793























