छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल केलेल्या अवमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन.

0
40

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने भाज्यपालाच्या प्रतिमेला फासले काळे.

चंद्रपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद येथील कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमान करणारे विधान करून जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहे.

राज्यात ठीक ठिकाणी भाज्यपाल यांच्या निषेधार्थ तीव्र रोष व्यक्त करीत आंदोलने होत आहेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देखील भाज्यपाल कोश्यारी यांच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला काळे फासत तात्काळ महाराष्ट्र राज्यातून हाकलण्याची मागणी करीत आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यांची राज्यपाल या घटनात्मक पदाची धुरा सांभाळत असलेले भगतसिंग कोश्यारी यानी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई फुले यांचा अपमान करणारी विधाने केली आहेत. भगतसिंग कोश्यारी हे विकृत बुद्धीने वारंवार महापुरुषांचा अवमान करत आहे. त्यामूळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतीक अधिकार नाही.

चार दिवसांपूर्वी वि. दा. सावरकरांचा अपमान झाला. म्हणून मंत्रीमंडळ बैठकीत निषेध करणारे शिंदे-फडणवीस सरकार महाराजांच्या अवमानाबद्दल मात्र गप्प आहे. याचा अर्थ या सरकारसाठी छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीमाई फुले हे महापुरूष नाहीत का..? असा प्रश्न देखील सर्व सामान्य नागरिकांपुढे उपस्थित होत आहे.

आज केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष फयाज शेख, विधानसभा अध्यक्ष आकाश निरटवार, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, शहराध्यक्ष कोमील मडावी, पंचायत समिती सदस्य पंकज धेंगारे, मा.सरपंच अमोल ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य अनुकूल खंडाळे, केतन जोरगेवार, संभाजी खेवले, सूरज चव्हाण, गणेश बावणे, सौरभ घोरपडे, अरविंद लोधी , सुधीर पोइला, विपिल लभाणे, पंकज मेंढे, मंगेश वैद्य, चेतन अनंतवार, कपिल ऊईके, नंदू मोडे, राज शेट्टी, पियूष श्रीवास्तव, सिद्धांत खोटे, संदीप बिसेन, नदीम शेख, सिहाल नगराळे, भोजराज शर्मा, पवन बंडीवार, गणेश यादव, संजय रामटेके, सतीश मांडवकर, राहुल देवतळे, पियूष चांदेकर, राहुल भगत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here