योग नृत्य परीवार आझाद गार्डन टीम द्वारे मनपा स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धेत समाधी वॉर्ड येथील गोविंद स्वामी मंदिर परिसर अतिशय परिश्रम करून कायापालट करण्यात आला.
संघ प्रमुख मुग्धा तरुण खांडे यांनी योग नृत्य परीवार चे जनक भाईश्री गोपाल जी मुंदडा यांच्या मार्गदर्शनात आपली संपूर्ण टीम घेऊन गोविंद स्वामी मंदिर सोबतच अंचलेशवर बस स्थानक देखील स्वच्छ केले, रंगरंगवटी केली. या टीम ने कोणतेही आधूनिकरन न करता परिसरात सौंदर्यीकरण केले, आपली माती जपणे, पाणी मातीत मुरवणे हा उद्देश समोर ठेवला. झाडांच्या खोडाला ऑईल पेंट न लावता गेरू आणि चुना लावण्यात आला, ज्यामुळे झाडांना कोणतीही हानी पोहोचणार नाही. सौंदर्यीकरण करतांना पर्यावरणाचा देखील विचार करण्यात आला आहे.
ज्या मंदिरात कोणी येत नव्हतं तिथे आज एक लग्न कार्य पार पडले. परिसरात स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा नवरदेवाने आशीर्वाद घेतला. मुग्धा खांडे म्हणाल्या आज आम्हाला जनतेने पहिला पुरस्कार दिला आहे. विशेषतः पुनम पिसे, मीना निखारे, राधिका मुंदडा, मयुरी हेडाऊ, रंजना मोडक, रुबी शेख, रवी निखारे, आकाश घोडमारे, बाळकृष्ण माणूसमारे, सूरज घोडमारे, सुरेश घोडके,
तरुण खांडे, श्रवण मुंदडा, विशाल गुप्ता, संतोष पिंपलकर आणि इतर मंडळींचे मोलाचे योगदान मिळाले
.*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793