पुढील 45 दिवस ते काढू शकणार रामाळा तलावातील मासे महानगर भाजपाच्या पुढाकाराने मच्छीमारांना मिळाला अवधी

0
102
येथील रामाळा तलावातील मासे आता पुढील 45 दिवस काढता येणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या पूर्वी 30 दिवसांचा अवधी मच्छीमारांना दिला होता.हा कालावधी वाढवून मिळावा अशी मागणी मच्छिमारांनी केल्यावर महानगर भाजपाने पुढाकार घेत भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत,निवेदन सादर केले.
यावेळी माजी उपमहापौरराहूल पावडे,दतप्रसन्न महादणी जी,भाजपा नेते राकेश बोमनवार,निमेश आकेवार व मच्छिमार बांधव संतोष झा,शंकर गुमलवार,किशोर मंचलवार,रमेश रामगुंडवार,राजू गुमजवार,सुनील मंचलवार,रवी मंचलवार यांची उपस्थिती होती.
सद्या स्थितीत रामाळा तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम जिल्हाप्रशासनासने हाती घेतले आहे.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारातून या तलावाचे सौंदर्यीकरण होत आहे.जिल्हा प्रशासनाने हा तलाव एका महिन्यात संपूर्ण पाणी काढून कामाला सुरुवात करण्याचे जाहीर केल्याने मच्छीमारांसमोर अडचण निर्माण झाली.तलावातील मासोळ्या फारच छोट्या असून 30 दिवसात तलाव रिकामा केला तर त्याचा आर्थिक भुर्दंड मच्छिमारांना सहन करावा लागेल याकडे डॉ मंगेश गुलवाडे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे लक्ष वेधल्याने त्यांनी 15 दिवसांचा कालावधी वाढवून दिला आहे.जिल्हाप्रशासनाच्या या निर्णयाचे आता कौतुक केले जात आहे.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here