*मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांच्या 83 व्या वाढदिवसा निमित्य सामाजिक कार्यात कार्य करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला*

0
30

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा.पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांच्या 83 व्या वाढदिवसा निमित्य चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या पुढारातून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या 83 जेष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम चंद्रपूर शहर येथील यंग रेस्टॉरंट मधील हॉल मध्ये घेण्यात आला
कार्यक्रमाच्या सुरवातीला शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पवार साहेब ह्यांचे सामाजिक कार्या बद्दल विस्तृत माहिती सादर केली त्या नंतर उपस्तीत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात जेष्ठ नेते बाबासाहेब वासाडे ह्यांनी आदरणीय पवार साहेब ह्यांच्या सोबत कार्य केलेल्या जुन्या आठवणी उजाविळ केल्या आणि उपस्टितांनी टाळ्या वाजवून मनोगताचे स्वागत केले
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर्,जेष्ठ नेते हिराचंद बोरकुटे साहेब, ओ बी सी जिल्हाध्यक्ष आरिकर साहेब,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, जेष्ठ नेत्या शिभाताई पोटदुःखे,महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे,विनोद लाभणे, धनंजय दानव, किसंनजी झाडे युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, उपस्थित होते
सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या 83 जेष्ठ नागरिकांन मध्ये इंजि प्रदीप अडकीने साहेब,पत्रकार चंद्रगुप्त रायपुरे, ऍड वैशाली टोंगे, किशोर पोतनवार, डॉ दाभेरे, गोपाळराव सातपुते, शालीक भोयर,भैयाजी मुळेवार, रामप्यारे शर्मा,तऱ्हाणे साहेब पठाण साहेब ह्यांच्या सह सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या 83 जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला,
सत्कार कार्यक्रमाचे संचालन विध्यार्थी अध्यक्ष कोमिल मडावी ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर महासचिव धनंजय दानव ह्यांनी केले
सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या यशस्विते साठी चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here