*यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा :- लिंगोरावजी सोयाम*

0
38

 

*गडचांदूर आदिवासी मुलांच्या वसतिगृहात मार्गदर्शन मेळावा संपन्न*

=========================

गडचांदूर :- स्थानिक आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह गडचांदूर येथे गृहपाल दुर्गेश दरबेशवार यांच्या संकल्पनेतून दर शनिवार ला मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात येतो.

आज जिवती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या येरमी येसापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, कवी तथा सामाजिक कार्यकर्ते लिंगोराव सोयाम यांचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित असणे गरजेचे आहे. यशाचा पाठलाग करत असताना आपलं ध्येय भटकता कामा नये आणि जिद्द, चिकाटीने मेहनत करत विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले. सोयाम यांनी पुढे बोलताना विद्यार्थी जीवनात महत्वाचा असलेला दररोजचा दिनक्रम, आरोग्य व पोषक आहार, पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरवात आदिवासी क्रांतिकारक शहीद वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.

यावेळी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह गडचांदूर चे गृहपाल दुर्गेश दरबेशवार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

=========≠======≠≠=======

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here