*जणसामान्य माणसांची व्यथा मांडणारे कवी तयार व्हावेत. :- पांडुरंग जाधव*

0
27

========≠=====÷÷÷÷÷÷÷÷÷===

 *नागवंश युथ फोर्स राजुरा च्या वतीने काव्यमय प्रबोधन संपन्न.*

=============================
राजुरा :- भारत हा शेतीशी आणि मातीशी जुळलेला देश आहे. या देशामध्ये जणसामान्य माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, त्या व्यथा कवितेच्या माध्यमातून मांडणारे कवी आज समाजात तयार झाले पाहिजे असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव यांनी केले, ते राजुरा येथे आयोजित काव्यमय प्रबोधन संध्या या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

पुढे जाधव बोलताना म्हणाले की कविता या केवळ काव्यसंग्रह तयार करण्यासाठी नाही तर जणसामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तयार करावे असे आवाहन त्यांनी मार्गदर्शन करताना केले.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, अ. भा. भ. वि. जाती वेलफेअर संघाचे प्रदेशाध्यक्ष आनंदरावजी अंगलवार, कवी, गझलकार तथा प्रबोधनकार इंजि. अनंत राऊत, चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरन चंद्रपूरचे गजाननजी इंगळे, ठाणेदार वडस्कर यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर कवी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन नागवंशी युथ फोर्स राजुऱ्याचे संस्थापक अमोल राऊत यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी नागवंश युथ फोर्स च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

====÷÷÷÷========÷÷÷÷÷÷=÷÷÷

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here