* सरदार पटेल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न *

0
28

=====================

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे “ग्रामविकासाकरीता युवाशक्ती” या विषयावर दि. २७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजित केले होते. या शिबिराचे समारोपीय समारंभ दि. ०१ फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आले.

=======÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, प्रमुख विशेष अतिथी प्राचार्य डॉ. सुभाष मेकाला प्राचार्य जनता महाविद्यालय चंद्रपूर, प्रमुख अतिथी अनकेश्वर मेश्राम उपसरपंच ग्रामपंचायत विसापूर, प्रमुख पाहुणे प्रा. शालिनी जयस्वाल राष्ट्रीय शारिरीक शिक्षण महाविद्यालय विसापूर, डॉ. एजाज शेख प्रभारी प्राचार्य शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार,  डॉ. सरोजकुमार दत्ता शारिरीक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख, शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर, रा. से. यो विभागीय समन्वयक डॉ. उषा खंडाळे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड, डॉ. वंदना खनके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखील देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन करताना डॉ. वंदना खनके म्हणाले की, या शिबिरात रस्ता सुरक्षा व वाहतूकीचे नियम, सायबर सुरक्षा, आरोग्य तपासणी शिबिर, जल संवर्धन, रोजगार, स्वयंरोजगार व करिअर मार्गदर्शन, शासकीय योजनेची माहिती या विषयावर वक्त्यांनी आपल्या भाषणातून स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच गावात मतदान व स्वच्छतेवर जनजागृती करण्यात आली. तसेच “विद्यापीठ आपल्या गावात” या उपक्रमांतर्गत गावातील युवक शिक्षणापासून वंचित असेल त्या युवकांना पुढील शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. स्वयंसेवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी स्वयंसेवकांना उपसरपंच अनकेश्वर मेश्राम, डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, प्रा. शालीनी जयस्वाल, डॉ. सुभाष मेकाला यांनी आपल्या भाषणातून स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले तर साहील गायकवाड, प्रांजली बोढाले या स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रमोद एम.काटकर म्हणाले की, अलीकडच्या काळात समाजात वेगवेगळ्या विचित्र घटना घडताना आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत आजचा तरुण कुठे तरी भरकटत जाऊ नये म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाजपरिवर्तन करण्याचे कार्य आज राष्ट्रीय सेवा योजनेचा तरुण करीत आहे.
या शिबिराचे संचालन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. पुरुषोत्तम माहोरे, प्रास्ताविक व अहवाल वाचन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना खनके तर आभार रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी केले.
या शिबिराचे यशस्वीतेकारिता रसेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. वंदना खनके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखील देशमुख, दशरथ कामतवार, अनिल पारशीवे, शशीकला पारधी, हनूमंतू डंबारे, इजाज शेख, सुरज बोरघरे, रुचिता टोकलवार, राणी गोंड, दर्शन मेश्राम, सिध्दांत निमसरकार, भैरव दिवसे, साहिल चौधरी, शालिनी निरमलकर, उर्वशी बोडपल्लीवार तसेच प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेडडीवार, उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षित. सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमाद एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वपील माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावार मार्गदर्शन लाभले.
=====================
*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===============≠===
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here