* जिवतीत शिक्षणाचा खेळखंडोबा, मास्तर द्या हो मास्तर म्हणत चक्क विद्यार्थ्यांनी केला रस्ता जाम *

0
28

==================

जिवती/

==========≠==============
तालुक्यापासून सात किलमीटरवर असलेल्या जिल्हा परिषद पाटागुडा शाळेत शिक्षकांनी गोंधळ मांडला आहे.कधी शिक्षक सुट्टीवर तर कधी अवेळी येतात.त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.म्हणून चक्क विद्यार्थीच आज रस्त्यावर उतरून रस्ता जाम आंदोलन केले.ही बातमी व्हॉट्सॲप च्या माध्यमातून वायरल झाली शाळेतील प्रकार पाहता या विद्यार्थ्यांची कीव येते. रजा मंजूर नसतांना देखील शिक्षक सुट्टीवर जातात ही प्रशासनाची कमजोरी लक्षात येते.प्रकरण पाहत गावचे पोलिस पाटील यांनी टेकामांडावा येथील पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली त्यावेळी सहाय्यक उप निरीक्षक रवींद्र म्हैसेकर हे आपल्या ताफ्यासह शाळेत पोचले त्यांनी विद्यार्थ्याच्या समस्या ऐकून घेतल्या.विद्यार्थी सांगत होते की शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकटी जाधव यांनी सांगितले की सहा महिन्यापासून तालुक्याला पत्र व्यवहार सुरू आहे पण कोणी लक्ष देत नाही आहे.यावेळी केंद्र प्रमुख बावणे यांनी सांगितले की तालुक्यात अठहावन शिक्षकांची पदे कमी आहेत त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली असून यावर चार दिवसात शिक्षक देऊन समस्या सोडवून देण्याचे आश्वासन दिले.विद्यार्थी सांगत होते की आम्ही यंदा क्रीडा स्पर्धांचे तयारी केली पण आम्हाला कोठेच क्रीडा संमेलनात सहभागी करून घेतले नाही. बानकर व कोयलवार हे मनमानी सुटीवर राहतात.या शिक्षकांना नेमक बळ कुणाचं आहे असा प्रश्न गावकरी विचारणा करीत होते.शेवटी विद्यार्थी पंचायत समितीच्या दिशेने पायी प्रवास करीत निघाले.विद्यार्थी सांगत होते की आम्ही चक्क शिक्षण अधिकारी यांचे दालनात जाऊन बैठक करणार आहोत.आणि ते गावातून एक ते दीड किलोमीटर अंतर कापले होते.त्यावेळी मुलांना दुपारचे जेवनही नव्हते, भर उन्हात मुले चटके सहन करत बसले होते म्हणुन गावातील पोलिस पाटील, पोलिस प्रशासन, केंद्र प्रमुख यांनी मुलांची समजुत काढत शाळेत नेले.

” पाटागुडा शाळेतील दोन शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यांची चौकशी सुरु असुन त्यांना कार्यमुक्त करुन जिल्हा परिषदेला पाठवणार आहे “. : भागवत रेजिवाड. संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती जिवती.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here