*मा. ना. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ विश्लेषण व चर्चात्मक बैठक संपन्न*

0
26

======================

*मा. ना. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ विश्लेषण व चर्चात्मक बैठक संपन्न*.  

==========================

*अत्यंत महत्वपूर्ण व सर्वसमावेशक अर्थसंकल्प; मा. शिवानीताई दाणी*.     

=======================

*राष्ट्रसर्वतोपरी अर्थसंकल्प; मा. डॉ. मंगेश गुलवाडे*

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला २०२३-२४ चा अर्थसंकल्प प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावा, देशाची आर्थिक स्थिती लोकांना समजून यावी, सरकार लोकांकरिता काय नवीन योजना आणत आहेत याची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने देशातील प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ विश्लेषण व चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या निमित्ताने चंद्रपूर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात दि. ०७ फेब्रुवारी रोजी सायं ५ वाजता मा.ना. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात नागपूर येथील मा. शिवानीताई दाणी, अर्थतज्ञ व महामंत्री, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश यांच्या विशेष उपस्थितीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ विश्लेषण व चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आपल्या प्रास्तावनेत, २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प हा अमृतकाल बजेट आहे. मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देशाला सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे. इतर देश्याच्या तुलनेत आपल्या देशाला कोरोनापासून देशाचा बचाव करण्याकरिता २२० करोड पेक्षा अधिक लसीकरण करण्याचे ध्येय पूर्ण केले तसेच या आठ वर्षाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देशात बहुसंख्येने नविन मेडिकल कॉलेजची निर्मिती व प्रस्तावीत १५७ नविन नर्सिंग कॉलेज व अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या तसेच महिला सशक्तीकरण, युवावर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता विशेष योजना निर्माण केले यामुळे हा अर्थसंकल्प राष्ट्रसर्वतोपरी अर्थसंकल्प असल्याचे डॉ. मंगेश गुलवाडे यांनी म्हटले आहे.

यावेळी मार्गदर्शनात मा. शिवानीताई दाणी यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अर्थव्यवस्थेत पाचव्या स्थानी आहे, देशात वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण योजना निर्माण करण्याचे काम या आठ वर्षाच्या काळात होत आहेत, २०२३ च्या अर्थसंकल्पात युवा वर्गासाठी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे, तसेच सामान्य जनतेला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असून नोकरदारवर्ग, छोटे व मध्यम व्यापारी, शेतकरीवर्ग यांना लाभदायक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी २०२२ व २०२३ या वित्तीय वर्षातील एकूण आय व तुट याविषयी सोप्या शब्दात विश्लेषण केले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर, चंद्रपूर, डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा संघटन महामंत्री श्री. राजेंद्र गांधी, भाजपा जेष्ठ नेते श्री. प्रमोद कडू, महामंत्री भाजपा महानगर श्री. ब्रिजभूषण पाझारे, श्री. सुभाष कासनगोट्टूवार, चार्टर्ड अकाउंटंट अध्यक्ष श्री. दामोधर सारडा, अर्थसंकल्पाचे अभ्यासक श्री. उद्धवजी बोनगिरवार, , फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज फेडरेशन ऑफ ट्रेड चे अध्यक्ष श्री. रामकिशोरजी परमार, विश्वहिंदू परिषदेचे अध्यक्ष, रोडमल गहलोत, केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे सचिव श्री. मिलिंद गंपावार, आर्किटेक संघटनाचे अध्यक्ष श्री. धर्मेंद्र पंडीत, आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार, माजी महापौर सौ. अंजलीताई घोटेकर, जिल्हाध्यक्ष भाजयुमो श्री. विशाल निंबाळकर, मंडळ अध्यक्ष श्री. दिनकर सोमलकर, श्री. संदीप आगलावे, श्री. विठ्ठल डुकरे माजी नगरसेविका सौ. शीलाताई चौव्हाण, सौ. जयश्रीताई जुमडे, सौ. मायाताई उईके, सौ. शीतलताई आत्राम, सौ. रेणूताई घोडेस्वार, सौ. प्रभाताई गुळधे, सौ. प्रज्ञाताई बोरगमवार, सौ. वंदनाताई संतोषवार, सौ. रंजिताताई येले, सौ. मुग्धाताई खांडे, सौ. सुशमाताई नागोसे, सौ. वर्षाताई सोमलकर, श्री. अजय सरकार, श्री चंद्रशेखर गणूरवार, श्री. सुनिल डोंगरे, श्री. अमित कासनगोट्टूवार, श्री. धनराज कोवे, श्री. विनोद शेरकी, श्री. सुर्यकांत कुचनवार, श्री. बी.बी. सिंग, श्री. चाँद पाशा, श्री. प्रमोद शास्त्रकार, श्री. चंदन पाल, तसेच सर्व भाजपा पदाधिकारी व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन श्री. ब्रिजभूषण पाझारे यांनी तर आभार प्रदर्शन कुणाल गुंडावार यांनी केले.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here