*आम आदमी पार्टी भद्रावतीच्या प्रयत्नाला यश अनुकंपा धारक महिलांचे आंदोलन अखेर मागे * ,

0
44

=======================

दिनांक 1 मार्च 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावतीचे शहर अध्यक्ष सुरज भाऊ शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक व तालुकाध्यक्ष सोनल पाटील यांच्या सतत प्रयत्नाने अनुकंपा धारक महिलां तर्फे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. सतत पाच दिवस पेक्षा जास्त सुरू असलेल्या आंदोलनाला KPCL चे CMD साहेब यांनी भेट दिली, व आश्वासन दिले की त्यांना लवकरात लवकर शासनाच्या नियमाप्रमाणेच व सवलतीप्रमाणे कामावर घेण्यात येईल व इतर सगळ्या मागण्या मान्य करण्यात येईल. त्यामुळेच महिलांकडून आपलं आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाकडून महिलांना पुष्पगुच्छ देऊन आंदोलन शांती पणे यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले व त्यांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी जयाताई कोरडे, रंजनाताई बालपने, मनीषाताई येरमे, अर्चनाताई फटाले, बेबीताई उईके, शालुताई निखाडे, मंगेश भाऊ निखाळे, गणेश भाऊ फटाले, सौरभ भाऊ बालपने यांनी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाचा खूप खूप आभार व्यक्त केला. यावेळी आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरज भाऊ शहा, शहर उपाध्यक्ष सुमीत हस्तक, तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल, शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर, शहर सचिव विजय सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर सहसचीव सचिन पाटील, महिला शहराध्यक्ष प्रतिभा कडूकर, शहर महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा शहर सचिव अतुल रोडगे, मंगेश खंडाळे, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, प्रफुल्ल शेलार, श्याम पिंपळकर, नितीन भाऊ देवगड़े, रितेश नगराळे, राजेश नरवडे, बाळू बांदुरकर, प्रदीप लोखंडे, चेतन खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरी स्वामी, व्यापारी आघाडी प्रमुख घनश्याम भाऊ गेडाम, राजू भाऊ कोड़ापे, शुभम रामटेके, शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर, बाळकृष्ण पिंपळकर, आनंद पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here