====================
* बल्लारपुर *.
====================
03/03/2023 रोजी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष गणेश सिलगमवार यांच्या नेतृत्वात उपमुख्याधिकारी काटकर साहेबांना निवेदन देऊन , शाळांमध्ये मिळणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या संदर्भात खालील माहिती मागण्यात आली.
1)शहरातील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन कोणत्या प्रकारे पुरवीले जाते?
2)गेल्या तीन महिन्यात किती विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात आले याची मासिक सत्यप्रत?
3)खाद्य पदार्थ कोण-कोणत्या स्वरूपात देण्यात येतात?
4)बल्लारपुर शहरात मध्यान्ह भोजन पूरविण्याची व्यवस्था कोणाकडे आहे?
5)भोजन कुठे बनविण्यात येते?
वरिल सर्व माहिती सत्यप्रत मागण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील आम आदमी पक्ष नगरपरिषद शाळांमधील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी या मागणीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. आता पक्षाने मध्यान्ह भोजनाच्या प्रश्नाकडेही या निवेदनाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर उपमुख्याधिकारी साहेबांनी शिक्षण विभागाकडून लवकरात लवकर यासंदर्भात लेखी माहिती तयार करून देणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळेस शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, शहर सचिव ज्योतिताई बाबरे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, यूथ सचिव रोहित जंगमवार, CYSS सह प्रमुख आशिष गेडाम, किसान आघाडी प्रमुख सुधाकर गेडाम, अफझल अली इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
=============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793






















