* सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने मनपाच्या 206 सफाई कंत्राटी कामगारांना अखेर दिलासा *

0
31

=====================

* सर्व सफाई कामगार लागले सफाईच्या कामाला * 
==========================

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत सफाईची कामे करणाऱ्या सुमारे 206 सफाई कंत्राटी कामगारांना कंत्राटदार कामावरून कमी करण्यात येणार असल्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. या कार्यवाहीने आता आपल्या कुटुंबांचे पालन पोषण कसे करायचे, असा यक्षप्रश्न या कामगारांसमोर उभा ठाकला होता. मागील काही दिवसांपासून या कामगारांनी कामावरून कमी करण्याच्या विरोधात सफाईची कामे बंद केली होती. यामुळे चंद्रपूर शहरात अनेक भागातील.  कचराकुंड्यांमध्ये कचरा गोळा झाला होता. शहराची स्वच्छता वेठीस धरल्यागत स्थिती निर्माण झाली होती. ही बाब राज्याचे सांस्कृतिक कार्य व वने मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आली. त्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घातले माजी उपमहापौर राहुल पावडे यांना सफाई कंत्राटी कामगारांसोबत थेट चर्चा करायला सांगितले. या चर्चेतून त्यांनी एकाही कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात येणार नाही ,अशी ग्वाही कामगार द्यायला सांगितली. आणि या ग्वाहीनंतर सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आता आपल्याला कामावरून कमी करण्यात येणार नसल्याचा दिलासा त्यांना मिळाला. अखेर आजपासून या कंत्राटी कामगारांनी सफाईच्या कामाला हात लावला आहे. त्यामुळे सर्व सफाई कामगारांनी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे. ;

=====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here