* विठ्ठल मंदिर प्रभागात अमृत योजनेचे काम निकृष्‍ठ दर्जाचे माजी सभापती ,सौ. संगिता राजेंद्र खांडेकर *

0
26

**********************

चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ येथे
अमृत योजनेचे काम सर्वप्रथम सुरु करण्‍यात आले. या प्रभागात अमृत योजनेचे
पाईप लाईन टाकण्‍यात आले व काही भागामध्‍ये पाईप लाईन टाकलेली नाही.
त्‍यामुळे काही भागात अमृत योजनेचे पाणी येत आहे व काही भागामध्‍ये अमृत
योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे. त्‍यामुळे तेथील नागरिक अत्‍यंत त्रस्‍त
झाले आहे.

**********************

विठ्ठल मंदिर प्रभागात ०४ वार्डाचा समावेश असुन जोडदेऊळ वार्ड, विठ्ठल
मंदिर वार्ड, गणपती वार्ड, बालाजी वार्ड या परिसरातील एरिया प्रभागात येत
असुन, काही भागात अमृत योजनेची पाईप लाईन टाकलेली नाही व काही भागात
टाकण्‍यात आलेली आहे. त्‍याचे अजुन टेस्टिंग करण्‍यात आलेली नाही.
त्‍यामुळे त्‍या भागात पाणी येत नसल्‍यामुळे नागरिकांमध्‍ये तिव्र
नाराजगी पसरलेली आहे.

**********************

विठ्ठल मंदिर प्रभागातील पिण्‍याच्‍या टाकीवरुन वार्डात नविन कनेक्‍शनला
पाणी देण्‍यात येत आहे. परंतु अर्ध्‍याभागात नविन कनेक्‍शनला पाणी तर
अर्ध्‍या भागात जुन्‍या कनेक्‍शनला पाणी देण्‍यात येत आहे. विठ्ठल मंदिर
प्रभागात पिण्‍याची टाकी असुन प्रभागातील नागरिकांना पिण्‍याचे पाणी मिळत
नाही. या टाकीचे पाणी समाधी वार्ड, पठाणपुरा वार्ड या भागात पाणी सोडले
जात आहे. ज्‍या प्रभागात पिण्‍याची पाण्‍याची टाकी आहे. त्‍याच भागात
अपूरे पाणी मिळत आहे व काही भागात पाणीच मिळत नाही. करिता पठाणपुरा व
समाधी वार्डातील पाणी दुस-या टाकीवरून जोडण्‍यात यावे, अशी मागणी
प्रभागाच्‍या माजी सभापती सौ. संगिता खांडेकर यांनी व्‍यक्‍त केली आहे.

**************

अमृत योजनेचे काम मागील ०५ वर्षापासून सुरु आहे. विठ्ठल मंदिर प्रभागात
सर्वप्रथम कामाला सुरुवात करण्‍यात आली. परिसरातील सर्व रस्‍त्‍यांवर
गड्डे खोदुन ठेवण्‍यात आले आहे. काही भागात गड्डे बुजविण्‍यात आले, तर
काही भागात गड्डे बुजविण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे या रस्‍त्‍यांना
प्रवास करतांना नागरिक गड्डयामध्‍ये पडत आहे. काही भागात नविन पाईप लाईन
टाकण्‍यात आली आहे. त्‍याची टेस्टिंग पण सुध्‍दा करण्‍यात आलेली नाही.
तसेच काही भागामध्‍ये नविन कनेक्‍शन देण्‍यात आलेले नाही. करिता
महानगरपालिकेने सर्व कनेक्‍शन धारकांना नविन कनेक्‍शन देण्‍यात यावे व
अमृत योजना सुरळीत करण्‍यात यावे.

*************************

महानगरपालिके तर्फे अमृत योजनेच्‍या नावावर ग्राहकाची थटा करत असल्‍याचे
जाणवत आहे. कारण एक वर्षाचा पाणी कर वसुल करीत आहे व त्‍यांना पाणी ०६
महिने देत आहे. एक दिवसा आड पाणी देत असल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून ०६
महिन्‍याचा कर घेण्‍यात यावा, अशी मागणी भाजपाच्‍या माजी सभापती सौ.
संगिता राजेंद्र खांडेकर यांनी व्‍यक्‍त केली आहे.

*************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here